SHIVBHOJAN THALI ESAKAL
महाराष्ट्र बातम्या

शिवभोजन केंद्रांसह थाळीवर मर्यादा! सर्वसामान्यांचे पोट उपाशीच

राज्यातील गरिब व हातावरील पोट असलेल्यांच्या रिकाम्या पोटाला दोन घासांचा आधार मिळावा म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. मात्र, केंद्रांची व सुरू असलेल्या केंद्रांवरील थाळीवरील मर्यादांच्या साखळदंडामुळे निराश्रित, निराधारांना दुपारनंतर उपाशीपोटी परत जावे लागत असल्याची स्थिती सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये पहायला मिळत आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील गरिब व हातावरील पोट असलेल्यांच्या रिकाम्या पोटाला दोन घासांचा आधार मिळावा म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. मात्र, केंद्रांची व सुरू असलेल्या केंद्रांवरील थाळीवरील मर्यादांच्या साखळदंडामुळे निराश्रित, निराधारांना दुपारनंतर उपाशीपोटी परत जावे लागत असल्याची स्थिती सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये पहायला मिळत आहे.

सोलापूर शहराची लोकसंख्या नऊ लाखांहून अधिक तर ग्रामीणची लोकसंख्या 35 लाखांहून अधिक आहे. जिल्ह्यात साधारणत: एक लाखांहून अधिक निराश्रित, निराधार आहेत, ज्यांना दोनवेळच्या जेवणासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक तालुक्‍यात किमान दहा शिवभोजन थाळी केंद्रे अपेक्षित आहेत. पण, मर्यादांमुळे ग्रामीणमध्ये सध्या 21 तर शहरात दहा केंद्रे सुरु आहेत. त्यातही राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून शिवभोजन केंद्रांसह तेथील थाळ्यांवर निर्बंध घातले आहेत. सकाळी नऊनंतर सुरु झालेले शिवभोजन थाळी केंद्र दुपारी साडेबारा ते एक वाजेपर्यंतच सुरु राहते. शासनाने घालून दिलेली थाळ्यांची मर्यादा संपल्याने ती केंद्रे अवघ्या तीन-साडेतीन तासांतच बंद होतात, ही वस्तुस्थिती आहे. शिवभोजन केंद्र चालकांना शहरातील एका लाभार्थीसाठी 40 रुपये तर ग्रामीणसाठी प्रत्येकी 25 रुपये दिले जातात. दुसरीकडे ती थाळी घेण्यासाठी प्रत्येक लाभार्थींना दहा रुपये द्यावे लागतात. दरम्यान, ग्रामीणमधील पंढरपूर तालुक्‍यात सध्या 12 केंद्रे सुरु असून त्याठिकाणी आणखी 15 ते 20 केंद्रांची मागणी आहे. पण, शासनाकडून त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. दुसरीकडे दररोज केवळ 75 ते 100 थाळ्यांची मर्यादा असल्याने बार्शीतील तीन तर इतर तालुक्‍यातील काही केंद्र चालकांनी शिवभोजन बंद करण्यासंबंधी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना कळविल्याचेही सूत्रांनी सांगितले.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केंद्र मंजूर, पण...
सोलापूरसह उस्मानाबाद, लातूर, बीड, इंदापूर व कर्नाटकातील कलबुर्गी, विजयपूर येथील बरेच रुग्ण मोफत उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात येतात. दररोज हजारो रुग्ण त्याठिकाणी उपचारासाठी दाखल होतात. त्याचवेळी त्यांच्यासोबत रुग्णांचे काही नातेवाईकदेखील असतात. त्यांना शिवभोजन थाळीचा लाभ घेता यावा म्हणून शासनाकडून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केंद्र मंजूर झाले. मात्र, दीड वर्षांनंतरही तेथे केंद्र सुरु करण्यासंदर्भात हॉस्पिटल प्रशासनाने सकारात्मकता दर्शविलेली नाही. त्यामुळे अजूनही त्याठिकाणी केंद्र सुरु होऊ शकलेले नाही.

अधिकारी म्हणतात...
- ग्रामीणमध्ये 21 तर शहरात शिवभोजन थाळीची दहा केंद्रे
- ग्रामीणमध्ये दोन हजार 160 तर शहरात दीड हजार थाळ्यांची मर्यादा
- शासनाने प्रत्येक केंद्राला 75 ते 150 थाळ्यांचीच दिलीय परवानगी
- दुपारी साडेबारानंतर बरीच केंद्रांचे टार्गेट पूर्ण झाल्याने तेथे मिळत नाही थाळी
- थाळ्यांच्या मर्यादेमुळे दररोज दोन हजारांहून अधिक निराश्रित जातात रिकाम्या पोटाने परत
- लाभार्थींचा फोटो, नाव व मोबाइल नंबर घेऊन त्याला दिली जाते शिवभोजन थाळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT