Congress 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; प्रियांका गांधींचा समावेश!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.4) काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाब नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह प्रियांका गांधी, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, अशोक गेहलोत यांचा समावेश आहे.

काँग्रेसचे हे नेते 21 ऑक्‍टोबरपर्यंत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. तर राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि शत्रुघ्न सिन्हा, सचिन पायलट आदी नेत्यांचे राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रोड शो आयोजित करण्याची तयारी प्रदेश काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची महाआघाडी असल्याने अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या संयुक्त सभाही आयोजित करण्यात येणार असून त्यासाठीचे नियोजन पूर्ण झाले आहे. 

शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेसकडून राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव, रजनी पाटील, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, ज्येष्ठ नेते नाना पटोले, नितीन राऊत, माणिकराव ठाकरे, एकनाथ गायकवाड, सचिन सावंत, हुसेन दलवाई, नसीम खान, बसवराज पाटील मुरूमकर, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमर राजूरकर, सुस्मिता देव, कुमार केतकर, चारुलता टोकस, मुकुल वासनिक, अविनाश पांडे यांचा समावेश आहे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Deputy Chief Minister Ajit Pawar: राहुल गांधींच्या आरोपात तथ्य नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार; 'हरल्यावरच ईव्हीएमची आठवण येते, जिंकल्यावर नाही'

Latest Marathi News Updates : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राखचा खून करून संशयितांचे मिरजेकडे पलायन

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Asia Cup 2025 : अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू असतानाच वडिलांचं निधन, श्रीलंकेच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT