महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रात मोदींच्या मेहनतीला यश नाहीच! २०हून अधिक सभा घेतल्या पण...

Maharashtra lok sabha election results 2024 : महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या २०हून अधिक सभा झाल्या असल्या तरी राज्यात सर्वाधिक खासदार निवडून आणणारा पक्ष काँग्रेस बनला आहे.

रोहित कणसे


दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०६ सभा घेऊन झंझावाती प्रचार करूनही भाजपला तिसऱ्यांदा स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. तुलनेने प्रमुख विरोधी पक्षातर्फे राहुल गांधी आणि प्रियांका गांधींच्या प्रचारसभांची संख्या मोदींच्या निम्मी असली तरी ‘इंडिया’ आघाडीने मोठे यश मिळवले आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या २०हून अधिक सभा झाल्या असल्या तरी राज्यात सर्वाधिक खासदार निवडून आणणारा पक्ष काँग्रेस बनला आहे.

पंतप्रधान मोदींच्या २०६ सभांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले होते. या व्यतिरिक्त प्रसारमाध्यमांना दिलेल्या ८० मुलाखतींच्या द्वारे देखील पंतप्रधान मोदींनी जनसंपर्क साधला होता. उत्तर प्रदेशातील मेरठमधून भाजपच्या औपचारिक प्रचाराला सुरवात केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी १५ ते १७ मार्च या कालावधीत दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगाण, आंध्र प्रदेश आणि केरळ या पाच राज्यांमध्ये प्रचार सभा घेतल्या होत्या.

तर, एकट्या महाराष्ट्रात मोदींच्या २० हून अधिक सभा भाजप आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी झाल्या होत्या. त्यामध्ये कोल्हापूर, रामटेक, परभणी, धाराशीव, कल्याण, अहमदनगर, दिंडोरी, चंद्रपूर, रामटेक, वर्धा, नांदेड, परभणी, सोलापूर, सातारा, पुणे, लातूर या मतदार संघांमधील सभांचा समावेश होता. मात्र महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षांना २०१९ च्या यशाच्या तुलनेत यावेळी अपेक्षित यश मिळवता आले नाही.

महाराष्ट्रात मोदींच्या प्रचार मोहिमेस चंद्रपूरमधून सुरवात झाली होती. परंतु या मतदार संघामध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या. येथे भाजपचे उमेदवार व राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार पराभूत झाले. तर नंदुरबारमध्ये आदिवासींच्या हक्कांच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी प्रचार केला होता. येथेही भाजपच्या हिना गावित यांना पराभव पत्करावा लागला. याखेरीज कोल्हापूरमध्ये पंतप्रधान मोदींनी शिवसेना (शिंदे) उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी देखील प्रचारसभा घेतली होती. कोल्हापूरमध्ये काँग्रेस उमेदवार छत्रपती शाहू महाराज हे निवडून आले.

राहुल, प्रियांकांचा जनसंवाद

दुसरीकडे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रचारसभा, रोडशो, पत्रकार परिषद या माध्यमातून १०८ वेळा जनसंवाद साधला. राहुल गांधींनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने प्रमुख मतदारसंघांना स्पर्श केला होता. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर दिल्लीत इंडिया आघाडीच्या संयुक्त प्रचारसभेसोबतच केरळ, मध्यप्रदेश, तेलंगण, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश यासह अन्य राज्यांमध्ये प्रचार केला होता. प्रियांका गांधींनी १०७ वेळा जनसंवाद साधला. तर, प्रियांका गांधींच्या मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रात सभा झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

PBKS vs MI Live : १४ चेंडूंत ४ विकेट्स! शार्दूल ठाकूरचा भन्नाट मारा... श्रेयस अय्यर आला तसा गेला, जसप्रीतचा डाव यशस्वी; Video

SCROLL FOR NEXT