Lok Sabha Election 2024 result CM Eknath Shinde on Shivsena performance in election naresh maske marathi news  
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha Election : लोकांचा गैरसमज दूर करण्यात आम्ही...; महाराष्ट्रातील लोकसभा निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

lok sabha election result cm eknath shinde : महाराष्ट्रातील एकूण लोकसभा निवडणूक निकालांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित कणसे

लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल आज जाहीर करण्यात आले. यामध्ये राज्यात महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान ठाण्यात शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा विजय झाला. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले.

ठाणे लोकसभा हा शिवसेनेचा, आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. येथे महायुतीचा भगवा विजयाच्या रुपाने डौलाने फडकतोय. एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघातून उमेदवार होता. सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा हा बालेकिल्ला आबाधित राहिला. जनतेने ठाण्यात विकासाला मतदान केलं. राज्य सरकारने दोन वर्षात केलेलं काम आणि मोदी सरकारने १० वर्षात केलेल्या कामाची पोचपावती या रुपाने मिळाल्याचे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

ठाणेकरांनी विरोधकांचा कार्यक्रम केला आहे, त्यामुळे नरेश मस्के विजयी झाले आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो. मी नरेंद्र मोदी यांचं देखील अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनत आहेत असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

शिवसेना एनडीएचा घटक पक्ष म्हणून त्यांच्या सोबत आहे. लवकरच त्यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार स्थापन केलं जाईल. इंडिया आघाडी मोदी हटाव या एकाच द्वेशाने पछाडलेले होते. ते मोदींना तडीपार करण्याची भाषा करत होते, पण देशातील जनतेने विकासाला मतदान करत तडीपारीची भाषा करणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलं आहे. विकासाचं राजकारण यापुढेही असणार आहे. या देशातील जनतेने मोदींना पसंती दिली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यात विरोधकांनी जो काही प्रमाणात अपप्रचार केला, संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली. लोकांचा गैरसमज दूर करण्यात आम्ही कुठं कमी पडलो याचा विचार आम्ही करू. त्यामध्ये दुरुस्ती करू असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT