Ajit-Pawar
Ajit-Pawar 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : पार्थ पवारांची उमेदवारी अद्याप जाहीर नाही - अजित पवार

सकाळवृत्तसेवा

पनवेल - पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या यादीनुसार मावळ मतदारसंघात योग्य वेळी उमेदवार जाहीर करू, अशी माहिती पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी दिली.

लोकसभेची घोषणा होताच पनवेल परिसरात नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून, शेतकरी कामगार पक्ष व कॉंग्रेसच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी अजित पवार आज पनवेलमध्ये आले होते. कॉंग्रेस भवनात झालेल्या चर्चेत कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी जातीयवादी पक्षाविरोधात एकत्र येत आपापसातील हेवेदावे विसरून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. यानंतर शेकाप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शेतकरी कामगार पक्ष शब्दाला जागणारा पक्ष असल्याचा उल्लेख करतानाच जातीयवादी पक्षाला पराभूत करण्याच्या हेतूने लोकसभा निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

"कोणत्याही पक्षाला शब्द दिलेला नाही'
विधानसभेच्या उमेदवारीबाबत कोणत्याही पक्षाला शब्द दिला नसल्याचे पवार यांनी या वेळी सांगितले. या वेळी मोदी सरकारवर टीका करताना सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढल्याची टीका पवार यांनी केली. "हम करे सो कायदा', हुकूमशाही, एकाधिकारशाही खपवून घेतली जाणार नाही, असे सांगतानाच संरक्षण विभागाची फाईल गहाळ होऊ शकणार नाही, असा दावाही पवार यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT