Radhakrishna-Vikhe-Patil
Radhakrishna-Vikhe-Patil 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : विखेविरोधी मोहिमेला लाल बावटा

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई - नगरमध्ये सुजय विखे पाटील यांनी केलेले बंड राष्ट्रवादी काँग्रेसने उभ्या केलेल्या अगतिकतेमुळे असल्याचा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा खोटा असल्याची भूमिका दिल्लीपर्यंत पोचली असली तरी, निवडणूक होईपर्यंत कारवाई करणे शक्‍य नसल्याचे कळवण्यात आले आहे. 

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक तंत्राने काँग्रेसला दुय्यम स्थान दिले असल्याचे बहुतेक नेत्यांचे मत आहे. प्रत्यक्ष विरोधी पक्षनेत्याला तीनदा हरलेली जागा जिंकण्याची शक्‍यता असताना पोटच्या मुलासाठी सहकारी पक्षाकडून मिळवता आली नाही. काँग्रेस पक्षाची अवस्था एवढी दयनीय का झाली याचा विचार करावा, असे काही ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. त्यातच डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना पदावरून पायउतार होण्याचा निरोप दिलाच तर काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पद गमवावे लागेल, अशी चिन्हे आहेत. नगर जिल्ह्यातील परंपरागत विरोधक बाळासाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या विखेविरोधी मोहिमेला दिल्लीहून सध्या लाल बावटा दाखवण्यात आल्याचे समजते. 

विखे यांना मानणारे किमान चार आमदार विधानसभेत आहेत. त्यातील एकजण त्यांच्या समर्थनार्थ केव्हाही राजीनामा देऊ शकेल हे लक्षात घ्या, असेही कळवण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT