SP-and-BSP
SP-and-BSP 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : राज्यातील सर्व जागा सप-बसप लढविणार

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनेही त्याग करण्याची गरज आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची मानसिकता दिसत नाही.

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी आम्ही महाराष्ट्रातही कायम ठेवण्याचा निर्णय केला असून, सर्व ४८ मतदारसंघांत लढणार असल्याचे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ही आघाडी विधानसभा निवडणुकीतही कायम राहणार असल्याचे नमूद करून बसपच्या नेत्या मायावती उमेदवारांच्या प्रचारासाठी पुढील महिन्यात सभा घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

काँग्रेसमुळे राज्यात धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होत असल्याचा आरोप आझमींनी केला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेसने सपने मागितलेली एक जागा द्यायला हवी होती. मात्र, काँग्रेसने चर्चेची तयारीही दाखवली नाही. त्यामुळेच, महाराष्ट्रातही सप आणि बसपने एकत्र येण्याचा निर्णय केला. आझमी म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सप-बसपने एकत्र येत चार जागांवर विजय मिळविला. आमच्यादृष्टीने ती सेमी फायनल मॅच होती. आता फायनल मॅच जिंकण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. काँग्रेससोबत महाराष्ट्रात आघाडी करण्यासाठी आमचा विचार सुरू होता. मात्र, काँग्रेसने दाद दिली नाही, असा आरोप आझमी यांनी केला.

बसपचे खासदार अशोक सिद्धार्थ म्हणाले की, बसप सोशल इंजिनिअरिंग करून यशस्वी झालेला पक्ष आहे. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांतील जातीची समीकरणे बघून उमेदवार घोषित केले जातील. बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. वंचितच्या नेत्यांनी आजवर एकदाही आमच्याशी संपर्क 
साधलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT