Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : ''मोदींनी डोळा मारलाय, पण मी जाणार नाही'', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना चिमटा

संतोष कानडे

Loksabha election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना एनडीएसोबत येण्याचं आवाहन केल्यानंतर ठाकरेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, मला मोदींनी डोळा मारलाय पण मी जाणार नाही. माझा महाराष्ट्र लुटणाऱ्यांसोबत मी जाणार नाही.. तुम्हाला मी इंगा दाखवेन, भवानी मातेचे तेज दाखवेल.. असा इशारा त्यांनी दिला.

जालन्यातील सभा रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजी नगरमधून मतदारांना संबोधित केलं. ते म्हणाले की, आज जालन्यात जाणार होतो मात्र पाऊस आला आणि हेलिकॉप्टर उडणे शक्य नव्हते म्हणून रद्द केला, जालन्याच्या नागरिकांची मी माफी मागतो.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राने मोदीजींना झुकवले आहे, शहेंशाहसारखे सध्या ते फिरताय, मोदीजी पोलीस बाजूला ठेवून जनतेत या ना.. सगळीकडे नुसते कडेकोट बंदोबस्त. एअर स्पेस बंद, सभेला छावणी , सगळीकडे पोलीस.. इतका बंदोबस्त असे तुम्ही फिरताय. तुम्ही माझा पक्ष पळवला, चिन्ह चोरले, माणसे फोडली तरी तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती वाटते.

ते पुढे म्हणाले की, केंद्र म्हणतंय की गेल्या काही वर्षात मुसलमानांची संख्या वाढली. याचं कौतुक करावं की टीका करावी. एकीकडे म्हणायचे नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि आता म्हणायचं आजा मेरी गाडी मे बैठ जा, आता पवारांना डोळा मारतायत.

''तुम्ही वेडेवाकडे बोलताय आम्ही कौटुंबिक बोलत नाही, तुम्ही माझ्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणाले, मला बाळासाहेबांची नकली संतान म्हणता, तुम्ही तुमचा आत्मा शैतानाला विकलाय बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल, विचार करा.''

ठाकरे पुढे म्हणाले, मोदीजी तुमचं सगळं फसवं आहे. तुम्ही फक्त फसवतात, तुमच्या गाडीला भ्रष्टाचाराची चाके आहेत.. हे इंजिन आता परत गुजरातला पाठवायचे आहे. 2014 साली तुम्ही युती तोडली, आमचं चुकलं 2019 साली आम्ही युती तोडणार होतो.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

  • मला भाजपला विचारायचंय, मोदी सेनाप्रमुख मासाहेब माझ्या कुटुंबीयांचा अपमान करताय, मोदीजी तुमच्या आई-वडिलांना तुमच्यावर संस्कार केले नाहीत का? ही भाषा योग्य नाही, शिकवणी लावा.

  • मला मोदींनी डोळा मारलाय मी जाणार नाही, माझा महाराष्ट्र लुटणाऱ्यासोबत जाणार नाही, तुम्हाला मी इंगा दाखवेल, भवानी मातेचे तेज दाखवेल.

  • प्रमोद महाजन असते तर तुम्ही पंतप्रधान झाले नसते. मराठी माणूस पंतप्रधान झाला असता

  • मोदीजी कधी काळी स्नेही होतात. मध्येमध्ये तुम्हाला अमच्यावर प्रेम येतं.. थोडं शांतीने घ्या, पतंजली तेल लावा आणि वनप्रस्थान ठेवा, माझ्या देशाची वाट लावू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET Exam Supreme Court : टीईटी परीक्षेबाबतचा ‘सर्वोच्च’ निकाल बहुचर्चित, शिक्षक वर्गात धास्ती शासनाकडे पुनर्विचार याचिकेची मागणी

Pratik Shinde Car Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रिल स्टार प्रतीक शिंदेची फॉर्च्युनर क्रेटाला धडकली, तीन गाड्यांचे लाखोंचे नुकसान

Maharashtra Rain : मान्सून जाता जाता झोडपणार, महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता; येत्या २-३ दिवसात कसं असेल वातावरण?

Bachchu Kadu: बोगस कृषी औषध निर्मात्या कंपन्या गुजरातच्या : बच्चू कडू, देवळीत दिव्यांग, शेतकरी, शेतमजुरांचा मेळावा

Kolhapur Gangwar : कोल्हापुरात गुंडाचा निर्घृण खून, गँगवारची शक्यता; मध्यरात्री पाठलाग करतानाचा थरारक Video

SCROLL FOR NEXT