Loksabha Election Hasan Mushrif Narendra Modi esakal
महाराष्ट्र बातम्या

Hasan Mushrif : मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यात 'त्या' माणसाची अडचण असेल, तर माझा नाईलाज आहे; मुश्रीफांचा कोणावर रोख?

विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमदेवार निवडून आणण्यासाठी ताकदीने प्रयत्‍न करणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नरेंद्र मोदी यांना पुन्‍हा पंतप्रधान करण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वात भाजपला आम्‍ही पाठिंबा दिला आहे.

कोल्‍हापूर : ‘शहराच्या विकासासाठी हद्दवाढ आवश्यक आहे. पुढील १० महिन्यांचा कालावधी यासाठी पुरेसा आहे. पहिल्या टप्‍प्यात शहराजवळील गावांचा समावेश करून हद्दवाढ करू,’ अशी ग्‍वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली.

तसेच येत्या डिसेंबरमध्ये गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्‍थितीत लोकसभा प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्‍हाधिकारी राहुल रेखावार उपस्‍थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्‍हणाले, ‘गेली २५ वर्षे आमदार, तर २० वर्षे राज्यात मंत्री म्‍हणून कार्यरत आहे. मात्र या कालावधीत जिल्‍ह्याचे पालकमंत्री पद मिळाले नाही. मात्र, आता हे पद मिळाल्याने आनंद झाला आहे. लोकसभा निवडणुकांना १० महिन्यांचा कालावधी राहिला आहे. या काळात खूप काम करायचे आहे.

यात प्राधान्याने शहराची हद्दवाढ, अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा, आयटी पार्क, एक हजार बेडच्या हॉस्पिटलची उभारणी केली जाणार आहे.’ मंत्री दीपक केसरकर यांनी दसऱ्या‍सह विविध उपक्रम थाटात करण्याचे नियोजन केले आहे. हे उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्‍न राहणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच ‘मेन राजाराम’संदर्भात जो काही निर्णय झाला असेल, त्याची अंमलबजावणी करणार असल्याचेही त्यांनी स्‍पष्‍ट केले.

डिसेंबर महिन्यात कोल्‍हापुरात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्‍थितीत सहकार परिषद घेण्यात येणार आहे. तसेच १ हजार बेडच्या हॉस्पिटलचे उद्‌घाटन त्यांच्या हस्‍ते केले जाणार आहे. तसेच महायुतीची १ लाख लोकांच्या उपस्‍थितीत जाहीर सभा घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची घोषणाही मुश्रीफ यांनी केली.

राजकारण एकीकडे व मैत्री...

मुश्रीफ म्हणाले, ‘आमदार सतेज पाटील यांच्याशी आपली मैत्री आहे. मात्र राजकारण एकीकडे व मैत्री दुसरीकडे राहील. स्‍थानिक स्वराज्य संस्‍था निवडणुकीतील समीकरण वेगळे असते. मात्र, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमदेवार निवडून आणण्यासाठी ताकदीने प्रयत्‍न करणार आहे. तसेच ठरलेल्या सूत्राप्रमाणे निधी वाटप केले जाणार आहे. विरोधकांनाही निधी देऊन, तक्रारीसाठी जागा ठेवणार नसल्याची ग्‍वाही त्यांनी दिली.

पंचगंगा प्रदूषणमुक्ती‍सह इचलकरंजीला पाणी

जिल्‍ह्यात पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्‍‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे पुढील काळात पंचगंगेसाठी नमामे गंगेप्रमाणे प्रकल्‍प राबवण्याची ग्‍वाही मुश्रीफ यांनी यावेळी दिली. त्याचबरोबरच इचलकरंजीला स्वच्छ व मुबलक पाणी देण्याची जबाबदारीही आपलीच असल्याचे त्यांनी सांगितले.

आलमट्टीसाठी प्रसंगी आंदोलन

‘आलमट्टीची उंची वाढवण्यासाठी केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकला परवानगी दिली आहे. ही बाब गंभीर आहे. आलमट्टीमुळे जिल्‍ह्यात महापूर येतो. धरणाची उंची वाढवल्याने महापुराचा आणखी धोका वाढणार आहे. ही उंची वाढवू नये, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली जाणार आहे. तसेच कर्नाटकच्या मंत्र्यांशीही चर्चा करण्यात येईल. तसेच वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा मुश्रीफ यांनी दिला.

...देव त्यांना सुबुद्धी देवो

‘विविध पक्षांतून अनेक नेते भाजपत आले आहेत. नरेंद्र मोदी यांना पुन्‍हा पंतप्रधान करण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वात भाजपला आम्‍ही पाठिंबा दिला आहे. जनतेचा विकास, पक्षाचा विस्‍तार आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान करण्यासाठी आम्‍ही पाठिंबा दिला आहे. मात्र, मोदी यांना पंतप्रधान होण्यात जर ‘त्या’ माणसाची अडचण असेल, तर माझा नाईलाज आहे, असे सांगत देव त्यांना सुबुद्धी देवो, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे (Samarjeet Ghatge) यांचे नाव न घेता लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT