machines for giving tickets in ST bus are getting hang  
महाराष्ट्र बातम्या

एसटी तिकीटाच्या स्मार्ट मशीन झाल्या हॅंग; कर्मचारी आणि प्रवाशांची वाढली डोकेदुखी    

चेतन देशमुख

यवमतमाळ : एसटी महामंडळात चार वर्षांपूर्वी तिकीट स्ट्रे बाजूला गेला. त्या जागी 'ईटीआयएम' मशीन आल्यात. आतापर्यंत मशीन व्यवस्थित सुरू होत्या. मात्र, आता हळूहळू अनेक अडचणी मशीनमध्ये येत आहेत. त्यातच नव्याने ज्येष्ठांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत स्मार्ट कार्ड देण्यात आले आहे. परंतु, आता हे अत्याधुनिक स्मार्ट कार्ड मशीनला लागतच नाही. तर काही मशीन "हॅंग' होत आहेत. त्यामुळे नवीन समस्या निर्माण झाली असून, प्रवाशांना डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.

एसटी महामंडळाने काळानुरूप काही बदल आपल्या पारंपरिक पद्धतीत केले आहेत. त्याचे फायदेही झालेत. असे असले तरीदेखील देखभाल दुरुस्तीअभावी आता तोटेही समोर येत आहेत. प्रवाशांना तिकीट देण्यासाठी एसटीत आधुनिक काळातही "स्ट्रे'चा वापर सुरू होता. त्यात बदल करून अत्याधुनिक मशीन दाखल करण्यात आली. असे असले तरी आजही वाहकांना मशीन सोबत "स्ट्रे' ठेवणे बंधनकारक आहे. 

चार वर्षांपूर्वी एसटीच्या ताफ्यात प्रवाशांना तिकीट देण्यासाठी मशीन दाखल झाल्या आहेत. त्यातील अनेक मशीनमध्ये आता बिघाड सुरू झाले आहेत. प्रिंटर काम न करणे, बॅटरी, मशीन हॅंग होणे, निपॅड अशा अनेक अडचणी उद्‌भवू लागल्या आहेत. त्यातच आता एसटी महामंडळाने आणखी एक मोठा बदल केला आहे. ज्येष्ठ नागरिकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना स्मार्ट कार्ड दिले आहे. 

त्याचा वापर एसटीने सुरू केला आहे. महामंडळात स्मार्ट कार्ड आले असले तरी मशीन जुन्या झाल्याने "एंट्री' होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. 'ईटीआयएम' मशीनला स्मार्ट कार्ड लावल्यास मशीनच हॅंग होत आहेत. अनेक मशीनमध्ये तर स्मार्ट कार्डवरून एंट्रीच होत नाही. याचा त्रास प्रवाशांसोबतच वाहकांनाही होत आहे. 

ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डद्वारे किलोमीटर निश्‍चित करून देण्यात आले आहे. मात्र, स्मार्ट कार्डची एंट्री होत नसल्याने अर्धीतिकीट दिले जात आहे. त्यामुळे कार्डमध्ये दिलेले अंतर जसाच्या तसेच राहत आहे. याशिवाय, विद्यार्थी, मासिक, त्रैमासिक पासधारकांनाही अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधी रक्कम भरून पास घेतल्यानंतरही स्मार्ट कार्डची एंट्री न झाल्यास वाहक व प्रवाशामध्ये वादावादी होत आहे. त्यामुळे आता मशीनला 'अपडेट' करण्याची वेळ आली असल्याची मागणी वाहकांकडून होत आहे.

राज्यभरात अडचणी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात तिकिटासाठी मशीनचा वापर केला जात आहे. साधारणतः: चार वर्षांपूर्वी महामंडळाच्या ताफ्यात मशीन दाखल झाल्या. आता राज्यभरातूनच वाहकांच्या तक्रारी होत आहेत. असे असले तरी तात्पुरती दुरुस्ती करून वेळ ढकलली जात आहे. सध्यास्थितीत नादुरुस्त मशीनची संख्या मोठी आहे. त्याकडे लक्ष देऊन अपडेटेड मशीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वाहकांकडून होत आहे. मात्र, आधीच अडचणीत असलेल्या महामंडळाला कोविडच्या काळात हा भार पेलणे शक्‍य दिसत नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प नरमले पण इराण युद्ध थांबवणार नाही, सांगितले 'हे' मोठे कारण

Satara Bribery Case: गुण नियंत्रण अधिकारी लाच घेताना ताब्‍यात; सातारा तालुक्यात खळबळ, खत तपासणीसाठी ५० हजारांची लाच, सापळा रचला अन्..

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना बंद! 2 वर्षे झाले अर्ज करून सोलापुरातील 600 ज्येष्ठ नागरिकांना मिळेना ‘तीर्थदर्शन’; शेवटची इच्छा अपूर्णच, वाचा...

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT