eknath shinde 
महाराष्ट्र बातम्या

राज्य सरकारकडून उद्या सामुहिक राष्ट्रगीत गायनाचं आवाहन

सरकारकडून यासाठीचं परिपत्रकही जाहीर जाहीर करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापनदिन कालच पार पडला. देशपातळीवर गेल्या वर्षभरापासून आपण स्वांतत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. त्याचाच भाग म्हणून आता राज्य सरकारनं उद्या सामुहिक राष्ट्रगीत गायनाचं आवाहन केलं आहे. यासाठी सरकारी परिपत्रकच काढण्यात आलं आहे. (Maha govt call for singing collective national anthem tomorrow GR published aau85)

सरकारनं आपल्या अध्यादेशात म्हटलं की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सर्व नागरिकांनी समूह राष्ट्रगीताचं गायन करावं. यासाठी उद्या आहे त्या ठिकाणी थांबून सकाळी ११ वाजता राष्ट्रगीत म्हणावं. यामध्ये राज्यातील शासकीय, खासगी तसेच इतर सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये स्थानिक शिक्षण संस्था, विद्यापीठातील शिक्षक विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील. खासगी अस्थापना, व्यापारी प्रतिष्ठानं यांनीही यामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन सरकारनं केलंय. याबाबतचा जीआर देखील काढण्यात आला आहे.

पतंप्रधानांनी हर घऱ तिरंगा हे अभियान राबवलं होतं याला चांगला प्रतिसाद देशभरातून मिळाला होता. यापार्श्वभूमीवर आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं सामुहिक राष्ट्रगीत गायनाचं आवाहन केलं आहे. पण आता याला कसा प्रतिसाद मिळतो हे पहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT