Mahadev-jankar 
महाराष्ट्र बातम्या

Mahadev Jankar : महादेव जानकर यांना कोरोनाची लागण

सध्या राज्यासह देशातील राजकीय मंडळी कोरोना पाॅझिटिव्ह होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सध्या राज्यासह देशातील राजकीय मंडळी कोरोना पाॅझिटिव्ह होत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी आज सोमवारी (ता.दहा) सोशल मीडियावर माहिती दिली आहे. जानकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने कोरोना टेस्ट (Corona) करुन घेतली. माझी कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. मी डाॅक्टरांच्या सल्ल्याने आयसोलेशनमध्ये आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी, अशी विनंती त्यांनी इतरांना केली आहे. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे रात्री ११ ते सकाळी पाचपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (Mahadev Jankar Tested Corona Positive)

मंत्रीही जनतेला कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करित आहेत. कोरोनाचा व्हेरिएंट ओमिक्राॅनचे रुग्णसंख्या वाढत चालली आहे. या व्हेरिएंटला कमी समजू नका. असा इशारा संशोधक देत आहेत. राज्यात आतापर्यंत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार रोहित पवार, अतुल भातखळकर, धीरज देशमुख यासह इतर राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

आठवडाभरापूर्वी मातृशोक, नितीश राणाने मैदानात उतरत आईला वाहिली अनोखी श्रद्धांजली

Shivsena Hearing: शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं? संजय राऊतांना जिंकण्याचा विश्वास, म्हणाले...

SCROLL FOR NEXT