MLA Europe Tour 
महाराष्ट्र बातम्या

MLA Europe Tour: महाराष्ट्रातील २२ आमदारांची युरोपात शाळा, ठाकरे गट अन् काँग्रेस नेत्यांचा समावेश, 'या' विषयावर करणार अभ्यास!

Sandip Kapde

MLA Europe Tour: राज्यातील सर्वपक्षीय २२ आमदार आजपासून युरोप दौऱ्यावर जाणार आहेत. १० दिवसांच्या या दौऱ्यामध्ये स्त्री-पुरूष समानता, महिला सक्षमीकरण, मत्स्य व्यवसाय आणि दुग्धव्यवसायाचा आमदार अभ्यास करणार आहेत.

युरोपमधील जर्मनी, नेदरलँड्स आणि लंडन येथे अभ्यास दौरा असल्याची माहिती मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटातून आमदार मनिषा कायंदे दौऱ्यावर जाणार आहेत.

या दौऱ्यात भाजपकडून ८, शिंदे गटाकडून २, ठाकरे गटाकडून १, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ५ तर काँग्रेसकडून ६ आमदार जाणार आहेत. या आमदारांसाठी हा दौरा महत्वाचा मानल्या जात आहे.

आमदारांच्या या अभ्यास दौऱ्यात स्त्री-सबलीकरणावर भर असणार आहे. त्यामुळे राज्यात परतल्यावर आमदार अमलबजावणी करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

युरोप दौऱ्यावर जाणारे आमदार-

  1. नीलम गोऱ्हे, शिंदे गट

  2. मनिषा कायंदे , शिंदे गट

  3. उदयसिंह राजपूत, ठाकरे गट

  4. सुनील कांबळे, भाजप

  5. नामदेव ससाणे, भाजप

  6. मनिषा चौधरी, भाजप

  7. मोनिका राजाळे, भाजप

  8. विद्या ठाकूर, भाजप

  9. अश्विनी जगताप, भाजप

  10. उमा कापरे, भाजप

  11. सीमा हिरे, भाजप

  12. सुमन पाटील, राष्ट्रवादी

  13. माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी

  14. सुनिल शेळके, राष्ट्रवादी

  15. अशोक पवार, राष्ट्रवादी

  16. मनोहर चांद्रिकापुरे, राष्ट्रवादी

  17. झीशन सिद्दीकी, काँग्रेस

  18. अभिजित वांझरी, काँग्रेस

  19. सुलभा खोडके, काँग्रेस

  20. प्रज्ञा सातव, काँग्रेस

  21. संग्राम थोपटे, काँग्रेस

  22. शिवराज लिंगाडे, काँग्रेस (Maharashtra Politics news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT