पेरणीसाठी शेतकऱ्याची चाड्यावर मूठ ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली, खरीप संकटात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून ओढ दिली आहे. वाढीच्या अवस्थेतील पिके पाण्याअभावी संकटात सापडली आहेत. मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भाच्या पश्‍चिम भागात पिके करपून चालली आहेत. येत्या काळात पाऊस न झाल्यास राज्यातील ७० ते ८० लाख हेक्टरवरील पिके अडचणीत येणार असल्याचा अंदाज कृषी विभागातील सूत्रांचा आहे. नजीकच्या काळात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

यंदा राज्यात खरिपाचे सरासरी १४१.९८ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ९ ऑगस्ट अखेरपर्यंत १३६.९७ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. सरासरी ९६ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीन, भात, तूर, नाचणी, भुईमूग या पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. तर ज्वारी, बाजरी, मका, मूग, तीळ, कारळे, सूर्यफूल, कापूस या पिकांच्या क्षेत्रात घट झाल्याचे दिसून येते. गेल्या १७ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने जवळपास ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पिके अडचणीत आली आहेत.

राज्यात एक जून ते ९ ऑगस्ट या कालावधीत पावसाची सरासरी ६२१.५ मिलिमीटर एवढी आहे. त्यापैकी ७१२.१ मिलिमीटर म्हणजेच सरासरी ११४.६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. गेल्या वर्षी ९ ऑगस्टपर्यत ६३०.२ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या १०१.४ टक्के पाऊस पडला होता. यंदा ५ जून ते २० या कालावधीत चांगला पाऊस बरसला. गेल्या महिन्यातही २२ ते २८ जुलै दरम्यान दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली. तर २१ ते २३ जुलै दरम्यान पुणे, सातारा, कोल्हापूरचा घाटमाथा आणि धरण क्षेत्रात विक्रमी पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर जूनमध्ये २० ते ८ जुलै, त्यानंतर २५ जुलैपासून ते आतापर्यंत चांगलीच ओढ दिली आहे. अडीच महिन्यांच्या कालावधीत जवळपास ३५ दिवस पावसाने ओढ दिली आहे.

खानदेशात पिके जळाली

पावसाच्या सुरुवातीपासून मध्य महाराष्ट्र व खानदेशात पाऊस कमी झाला आहे. यंदा नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक कमी पाऊस पडला आहे. जळगाव, धुळे, नाशिक या जिल्ह्यातही कमी पावसाची नोंद आहे. त्यामुळे या भागात कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिकांना सर्वाधिक फटका बसला असून पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी पिके जळाली असून अनेक ठिकाणी पिके करपली आहेत. नगर, नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांतही काही अंशी अशीच स्थिती आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशाच शेतकऱ्यांची पिके काही प्रमाणात चांगली आहे.

मराठवाड्यात पिकांची वाढ खुंटली

मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत सोयाबीन, कापूस, तूर पिकांचे मोठे क्षेत्र आहे. यंदा परभणी, नांदेड, जालना, हिंगोली जिल्ह्यांत अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्यातच औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. मध्यंतरीच्या काळात तुरळक सरी पडल्या असल्या, तरी अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यातच आता पावसाने उघडीप दिल्याने पिके सुकत आहेत. काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनात चांगलीच घट येणार असल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.

विदर्भात पिके सुकण्याच्या मार्गावर

पावसाळ्याच्या सुरुवातीपासून विदर्भात कमी पाऊस पडला आहे. अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा, वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात कमीअधिक स्वरूपात पाऊस पडला. पश्चिम विदर्भात पावसाचे प्रमाण हे कमीच असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. काही ठिकाणी पाऊस झाल्याने काही प्रमाणात पेरणी केली आहे. परंतु पाऊस नसल्याने पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी पिके अखेरची घटका मोजत असल्याने झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांपुढे चिंता वाढल्या आहेत. पूर्व विदर्भात धान पिके वाढीच्या अवस्थेत असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

पूर, अतिवृष्टीचा सव्वाचार लाख हेक्टरला फटका

यंदा २१ ते २४ जुलै या कालावधीत घाटमाथा व कोकणात अतिवृष्टीसदृश पाऊस पडला. यामुळे धरणांना पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टी, पूर अशा नैसर्गिक आपत्तींमुळे २२ जिल्ह्यांत चार लाख २१ हजार ४२५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. यामध्ये भात, नागली, सोयाबीन, ज्वारी, मका, ऊस, कापूस, हळद, तूर, मूग, उडीद, आंबा, मोसंबी, लिंबू, सुपारी अशी फळपिके व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

खरीप दृष्टिक्षेपात

- ९ ऑगस्ट अखेरपर्यंत १३६.९७ लाख हेक्टरवर पेरणी

- सरासरी ९६ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी

- सोयाबीन, भात, तूर, नाचणी, भुईमूग या पिकांच्या क्षेत्रात वाढ

- गेल्या १७ दिवसांपासून अनेक ठिकाणी पावसाचा खंड

- राज्यातील ७० ते ८० लाख हेक्टरवरील पिके अडचणीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

Latest Marathi News Live Update : पुण्यात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

Pregnancy Job Scam : महिलांना गरोदर करा आणि कमवा 10 लाख! 'प्रेग्नंट जॉब सर्विस'च्या नावाखाली मोठा घोटाळा उघड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT