Maharashtra Budget Session esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget Session: उद्धव ठाकरेंनी 'त्या' व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

रुपेश नामदास

अधिवेशन आता संपत आलेलं असताना विधानभवनात आज वेगळंच चित्र पाहायला मिळालं. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकेकाळचे मित्र पण आताचे कट्टर विरोधक एकत्रच विधानभवनात एकत्र येताना दिसले.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सध्या शेवटचा आठवडा सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आज देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्रच येताना दिसले. त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सभागृहाचं कामकाज सुरू होत असताना या दोघांनी एकत्रच हसत हसत विधानभवनात प्रवेश केला.

शिवसेनेतल्या बंडापासून आज पहिल्यांदाच हे दोघे एकत्र दिसले. दरम्यान यावर आता उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, आधी खुले पणा होता, आता बंद दाराआड चर्चा देखील फलदायी होते असं म्हणतात, कधी तरी आमची बंद दाराआड चर्चा झाली तर तेव्हा बोलू, आज आम्ही दोघे एकत्र प्रवेश द्वारातून येताना एकमेकांशी राम राम म्हणतात तसं ते झालं" अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

फडणवीस आणि ठाकरे हे दोघेही चालत येत असताना काहीतरी चर्चाही करताना दिसले. तोंडावर हात ठेवून उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना काहीतरी सांगताना दिसत आहेत. हे दृश्य पाहून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं मात्र आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT