Maharashtra Cabinet Expansion News esakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansion शिंदे गटाकडून सहा आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता

दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी ग्रीन सिग्नल

धनश्री ओतारी

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर उद्या सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच, राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली ती म्हणजे शिंदे गटाकडून कुणाला मंत्रिपदे मिळणार याची. दरम्यान, संभाव्य यादी आली समोर आली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून सहा आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता राजकीय गोटात वर्तवण्यात येत आहे.(Maharashtra Cabinet Expansion News Eknath Shinde BJP)

मंत्रिपदाची शपथ कोण घेणार, कुणाची वर्णी लागणार, तर कुणाला अजून वाट पाहावी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिंदे गट ६ ते ७ तर भाजपचे 11 जण शपथ घेऊ शकतात असे सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून सहा आमदारांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होण्याची शक्यता आहे. उदय सामंत, दादा भुसे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार आणि शंभुराज देसाई यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते.

भाजपकडूनही संभाव्य मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत. सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, नितेश राणे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, रवी राणा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.

लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अडथळा नाही. खात्यांची जबाबदारी सचिवांकडे दिली आहे. कोणत्याही खात्याचे काम थांबवले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते घेत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT