Maharashtra Din 2023 esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Din 2023 : कोकणातलं अनोखं गाव, प्रत्येक घरात २४ तास पोहचतं डोंगराचं पाणी...

या ठिकाणी निसर्गाच्या सौंदर्यात असे रमून जाल की तुम्हाला दुसरं काहीही सुचणार नाही

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Din 2023 : रत्नागिरीतील 'जांभरूण' या नावाने ओळखलं जाणारं हे गाव. या गावाला चहू बाजून डोंगरांनी मिठीत घेतलंय. या डोंगरातून खळखळ आवाज करत डोंगराचं पाणी घेऊन एक बारमाही नदी वाहते. याच डोंगरउतारावर भाताची खाचरं, माळ, फणस, आंबा, सुपारीच्या झाडांची गर्दी दिसते. मग या झाडांच्या गर्दीतून पाझरणारी मधूर वाणी, टुमदार कोकणी घरं आणि आपुलकीने भरलेली येथील माणसं असं ओसंडून वाहणारं निसर्गसौंदर्य या गावाला लाभलंय.

या गावात आजही २४ तास डोंगरांचं पाणी पाटाने झऱ्यातून वाहतं. या गावाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गावात ४०० - ५०० वर्ष जुनी खासगी मालकीची मंदिरं अजूनही शाबूत आहेत. ही मंदिरं घरं यांना दगडी पायवाटेने जोडलेलं आहे. यांना इथं 'पाखाड्या' म्हटलं जातं. अशा कितीतरी पाखाड्या, विशाल स्थानिक झाडं, मंदिर असा नैसर्गिक सांस्कतिक वारसा लाभलेलं निसर्गसमृद्ध असं गाव आहे. हे गाव सुमारे ४०० वर्ष जुनं आहे.

पुणे, कोकरूड, मल्कापूर, अंबाघाट, निवळी गणपतीपुडे रोडने कोतवडे फाट्यावरून डावीकडे वळून जांभरूणला जातं येतं. पुणे ते जांभरूण हे अंतर ३१४ किमी आहे. तर रत्नागिरीहून हे अंतर साधारण २४ किमी आहे. गावाजवळ येताच निसर्गाचं सौंदर्य बघून तुमची ही उत्सुकता आणखी वाढेल. तुम्हाला या ठिकाणी सतत खळखणाऱ्या नदीचा, पाठबंधाऱ्यांचा आवाज या ठिकाणी अनुभवायला मिळेल. (Amazing Tourist Places)

या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे येथे जिवंत झऱ्याचं पाणी खाली पाटांद्वारे वळवण्यात आलं. आणि त्याच पाटांवर घरं बांधून अक्षरश: चारशे वर्षांपासून लोक त्याच पाटांवर इथे राहाताय. सस्टेनेबल डेवलपमेंट नक्की काय असतं ते तुम्हाला इथे नक्की बघायला मिळेल. एकून एकवीस लेव्हलने २१ पाट जांभरूण या गावात बांधण्यात आलेले आहेत. गावातील नदीच्या वाहाणाऱ्या पाण्याचे सूर ऐकत तिथेच बसावंसं वाटतं. (Maharashtra Din)

येथील रानवाटांना रानफुलांनी अगदी सजवलेलं आहे. हे गाव जणू सृष्टीदात्याने रत्नागिरीला दिलेली अप्रतिम अशी देणगी आहे. लोक इथे येताच या जागेच्या प्रेमात पडतात. तेव्हा यंदा महाराष्ट्रदिनी तुम्ही कुठे जाण्याचा प्लान करत असाल तर तुम्ही या ठिकाणाला एखदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EU takes action against IRGC : युरोपियन युनियनने ‘इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ला दहशतवादी संघटना केलं घोषित!

Arijit Singh Possible to enter in Politics : अरिजीत सिंह राजकारणात करतोय एन्ट्री? ; पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ!

Ajit Pawar : दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अर्पण केली श्रद्धांजली, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठांत शुकशुकाट

Ajit Pawar :...ही दादांची सभा नव्हे दोस्ता, अखेरच्या निरोपाची वेळ आहे! विविध रंगछटा व हास्यमुद्रेतील दादांचे १२ फ्लेक्स पाहून कार्यकर्ते गहिवरले

T20 World Cup 2026 जिंकून सूर्यकुमारच्या नेतृ्त्वात टीम इंडिया इतिहास घडवणार? रवी शास्त्री म्हणाले, '१० मिनिटांचा खेळ...'

SCROLL FOR NEXT