Maharashtra Din
Maharashtra Din esakal
महाराष्ट्र

Maharashtra Din : महाराष्ट्रातील या ठिकाणाला लाभलाय 125 वर्षांचा इतिहास, निसर्गप्रेमींसाठी खास ठिकाण

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Din : उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की कुठेतरी फिरायला घेऊन जाण्याचा लहान मुलांचा हट्ट असतो. एप्रिल महिन्याच्या शेवटी साधारणत: सगळ्याच विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागतात. तेव्हा पालकांपुढे मुलांना नेमकं व्हेकेशनसाठी कुठे न्यायचं हा मोठा प्रश्न उभा राहातो. मात्र चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशा ठिकाणाबाबत सांगणार आहोत जिथे तुमची मुले बोरसुद्धा होणार नाहीत आणि या ठिकाणाला एकदा बघून तिथे परत परत जाण्याचा हट्ट करतील. तसेच निसर्गप्रेमींच्या दृष्टीनेही हे ठिकाण अगदी सुंदर आहे.

एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन हे पुण्यातील कॅम्प भागातील प्रसिद्ध उद्यान असून त्याला सुमारे १२५ वर्षांचा इतिहास आहे. वनस्पतिशास्त्राच्या दृष्टीने हे उद्यान अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच अनेक दुर्मिळ वृक्ष देखील उद्यानात पहायला मिळतात. मुलांचं मन रमेल आणि त्यांना आनंदही मिळेल अशी ही जागा आहे. निसर्ग प्रेमी विशेषतः वनस्पती अभ्यासकांच्या दृष्टीने तर हे उद्यान म्हणजे एक खजिनाच आहे. ब्रिटिश सैनिकांच्या विश्रांतीसाठी तत्कालीन सरकारने पुण्याच्या पूर्व भागात सोलापूर रस्त्याजवळ सोल्जर्स गार्डन तयार केले होते. त्याचे रूपांतर हळूहळू वनस्पती उद्यानात झाले.

या उद्यानाला कधीही भेट देता येते

हे उद्यान सर्व दिवस खुले असते. तुम्ही या उद्यानाल कधीही भेट देऊ शकता. वनस्पतींच्या निखळ सौंदर्याचे दर्शन घ्यायचे असेल तर जून ते डिसेंबर हा काळ उत्तम आहे. निवांत वेळ घालवायचा असेल तर एप्रिल ते मे महिना उत्तम आहे. जानेवारी महिन्याचा दुसरा किंवा तिसरा आठवडा हा उद्यानासाठी विशेष असतो. या दिवसांमध्ये बागेमध्ये पुष्प प्रदर्शन भरते. - त्यानिमित्ताने उद्यान विविध पानाफुलांनी सजलेले असते.

बागेला लाभलाय 125 वर्षांचा इतिहास

साधारणतः 1845 च्या सुमारास या बागेची मालकी ब्रिटिश सैन्याचे भारतातील प्रमुख सर चार्ल्स नेपियर यांच्याकडे गेली. - त्यावेळेस हे उद्यान 'गार्डन आॅफ डाॅ. डाॅन' म्हणून ओळखले जात असे. पुढे 1887 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव भारतात साजरा करण्यात आला. त्यावेळी उद्यानाचे नामकरण 'एम्प्रेस गार्डन' असे झाले. (Amazing Tourist Places)

त्यानंतर काही वर्षांतच म्हणजे 1892 मध्ये या उद्यानाची धुरा अॅग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेकडे सोपविण्यात आली. महाराष्ट्रात आता सर्रास दिसणारे गुलमोहोर, जॅकरांडा, मणिमोहोर यांच्यासारखे वृक्ष त्या काळी संस्थेने आयात करून उद्यानात रुजवले. तसेच फळझाडांमध्ये मोसंबीचा आवर्जून उल्लेख करायला हवा. उद्यानात सुमारे २५० ते ३०० प्रजातींचे मोठे वृक्ष आहेत. त्यांची एकूण संख्या सुमारे १७०० ते १८०० इतकी आहे. (Maharashtra Din)

कांचनवेल, किनई, धावडा, कळम आदींचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. बांबूंच्या प्रकारातील जायंट बांबू, बुद्धास बेली, हिरवा बांबू, पिवळा बांबू तसेच वेलींचाही त्यात समावेश आहे. कांचनच्या महाकाय वेलाचा उल्लेख त्यात करावा लागेल. या वेलीचा विस्तार तब्बल अर्ध्या एकरावर आहे. पाम कुळातील सुमारे पन्नास प्रजाती उद्यानात आहेत. बागेचा परिसर हा सुमारे ४० एकरांमध्ये पसरलेला आहे. (Pune) येथे लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळणी विभाग असून उत्तम प्रतीची खेळणी बागेत आहेत. येथील दुर्मिळ वृक्षांवर त्या वृक्षाची माहिती थोडक्यात प्रदर्शित केलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT