Maharashtra Din 2023 esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Din 2023 : 'महाराष्ट्राची चेरापुंजी', राजा भोज यांची महाराष्ट्राला मिळालेली उत्तम भेट

महाराष्ट्रातील या ठिकाणाला एकदा तरी नक्की भेट द्या

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Din 2023 : महाराष्ट्रात तुमचे वर्षभराचे सगळे विकेंड घालवता येतील एवढी प्रेक्षणीय ठिकाणं आहेत. यंदा महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातल्याच एखाद्या प्रसिद्ध आणि निसर्गरम्य ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्यायला हवी. आज आपण 'महाराष्ट्राची चेरापुंजी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशाच एका ठिकाणाला भेट देणार आहोत.

महाराष्‍ट्राची चेरापुंजी व मिनी महाबळेश्‍वर म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या गगनबावड्यात हा गगनगड आहे. गगनगडाची उभारणी 12 व्‍या शतकात झाली असून, त्‍याचे श्रेय शिलाहार राजवंशातील राजा भोज (द्वितीय) याच्याकडे जाते. इ.स 1658 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला. 19 व्‍या शतकात गगनगिरी महाराजांच्‍या वास्‍तव्‍यामुळे हा गड प्रकाश झोतात आला.

गडाच्‍या पायर्‍या चढून वर गेल्यावर डाव्या हाताला दगडातील एक प्रशस्त नैसर्गिक गुहा आहे. गगनगिरी महाराजांनी याच गुहेत तपसाधना केली होती. गुहेपासून पायर्‍यांच्या मार्गाने भक्तनिवासापासून वर चढत गेल्‍यावर आपण मोकळया पठारावर प्रवेश करतो. पठारावर डाव्‍या बाजूस संगमरवरी देऊळ ध्‍यानमंदिर आहे. गगनगडावर दरवर्षी लाखो भाविकांच्‍या उपस्थितीत दत्तजयंती सोहळा साजरा होतो.

Maharashtra Din 2023

गडाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?

तळापासून पायर्‍यांनी गडावर जाण्यास 5 मिनीटे लागतात. गडावर जेवणाची सोय (प्रसादाचे जेवण) आहे. गडावर पाण्याची सोय आहे. गगनगडाचे दरवाजे रात्री ९ ते सकाळी ५ बंद असतात. त्यामुळे या वेळेत इथे जाणे व्यर्थ ठरेल.

हिवाळ्यात गुलाबी थंडी अनुभवता येते. उन्‍हाळ्यात येथे तापमान कमी असते. तालुक्‍यात रानमेवा मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध होतो. गगनगडावर दरवर्षी लाखो भाविकांच्‍या उपस्थितीत दत्तजयंती (डिसेंबरमध्ये) सोहळा साजरा होतो. गगनगडावर गुरुपौर्णिमेच्या दिवशी हजारो भाविकांच्‍या उपस्थितीत साजरी होते. तसेच गडावरून निसर्गाचं सौंदर्य तुम्हाला जवळून अनुभवता येईल.

Maharashtra Din 2023

इथे जाण्याआधी पर्यटकांनी या गोष्टी लक्षात घ्या

गगनबावड्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथून तुम्हाला कोकणाकडे जाण्यासाठी दोन घाटरस्ते आहेत. पहिला करूळ घाट व दुसरा भुईबावडा घाट. या दोन्ही घाटांच्या तोंडाशी गगनगड किल्ला असून त्यावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे. (tourist)

पावसाळ्यात येथील दृष्य बघून लोकांना भूरळ पडते. या ठिकाणास पावसाचे माहेरघर म्हणून बघितले जाते. हिरवेकंच डोंगर, पश्चिमेकडून येणारा गार वारा आणि निखळ शांतता लाभलेला हा परिसर रमणीय आहे. करूळ व भुईबावडा घाटात पावसाळ्यात उगम पावणारे लहान मोठे धबधबे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची हौस भागविण्यास पुरेसे ठरतात. (Amazing Tourist Place)

या ठिकाणी जायचे कसे?

गगनबावडा कोल्हापूरहून ५५ कि.मी वर आहे. कोल्हापूरहून येथे येण्यासाठी नियमित बससेवा आहे. याशिवाय कोकणातून कोल्हापूरला जाणार्‍या बसेस गगनबावडा स्थानकात थांबतात. गगनबावड्यातून २ कि.मी ची पक्की सडक गगनगडापर्यंत जाते. गगनगडाच्या जवळजवळ अर्ध्या उंचीपर्यंत गाडीने जाता येते. गगनबावडा एस.टी स्थानकातून गडावर चालत जाण्यास ३० मिनिटे लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT