Shinde-Fadnavis Government esakal
महाराष्ट्र बातम्या

Shinde-Fadnavis: शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार; मविआच्या नेत्यांनी दिल्या तारखा

राज्याचे राजकीय वातावरण तापलं

रुपेश नामदास

Shinde-Fadnavis Government: राज्यात पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण तापलं आहे. सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसला धक्का देवून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे बाळासाहेब थोरात यांची चांगलीच गोची झाली. (Shinde-Fadnavis government will collapse)

दुसरीकडे नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार याची तारीखच जाहीर केली आहे. पटोले यांनी येत्या १४ फेब्रुवारीला हे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणीच केली आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या प्रचारावेळा नाना पटोले बोलत होते. यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

प्रचारा दरम्यान नितीन देशमुख यांनी ही सरकार कोसळेल असा दावा केला आहे. ते म्हणाले सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 'सर्वोच्च न्यायालय निकाल देईल. त्यावेळी १६ आमदार अपात्र ठरतील आणि हे सरकार कोसळेल असा दावा त्यांनी केला आहे.

तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखीन भविष्यवाणी केली आहे. त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे की सरकारचे काउंट डाऊन सुरू. शिवजयंती पुर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT