राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे टाळावेत असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते. मुंबईतील राष्ट्रवादी भवनातून मंगळवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, खासदार सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्यातील पूरस्थितीबाबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीची घोषणा केली. त्याशिवाय नेत्यांच्या दौऱ्यावरही त्यांनी निशाना साधला.
पावसामुळे सहा जिल्ह्यांत प्रचंड नुकसान झालं आहे. येथील पूरस्थिती ओसरली आहे. त्यानंतर राजकीय नेते दौऱ्यावर जात आहेत. पूरग्रस्त भागात दौऱ्यावर जाणं नेत्यांनी टाळावं असे आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्र्यांनी परिस्थिती समजून घेण्यासाठी दौरे केलेच पाहिजेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांचे दौरे लोकांना धीर देण्यासाठी महत्वाचे ठरत आहेत, असं शरद पवार म्हणाले.
शासकीय यंत्रणा,कार्यकर्ते हे पूरग्रस्तांना मदतकार्य करत आहेत. माझे आवाहन आहे मोठ्या नेत्यांनी दौरे करू नयेत. यंत्रणा आपल्या भोवती ठेवणे योग्य नाही. ज्यांचा त्या भागात संबंध नाही त्यांनी दौरे टाळावेत, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. राज्यपाल आज पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. ते केंद्राकडून जास्त मिळवून देतील अशी आशा आहे, असेही शरद पवार म्हणाले.
सहा जिल्ह्यात जवळपास 16 हजार कुटुंबांना फटका बसला आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टमार्फत या 16 हजार कुटुंबांना मदत केली जणार आहे. 16 हजार कुटुंबासाठी 16 हजार किट्सचं वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये भांडी, मास्क, पांघरुन आणि इतर जीवनावशक वस्तूंचा समावेश असेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथकं पाठवली जाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.