Aaditya Thackeray on Eknath shinde Government esakal
महाराष्ट्र बातम्या

मध्यावधी निवडणुकांसाठी शिवसेना तयार - आदित्य ठाकरे

मध्यावधी निवडणुकांसाठी शिवसेना तयार असल्याचे स्पष्ट संकेत आदित्य ठाकरेंनी दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मध्यावधी निवडणुकांसाठी शिवसेना तयार असल्याचे स्पष्ट संकेत आदित्य ठाकरेंनी दिले आहेत.

ज्यांनी व्हीपचं उल्लंघन केलं आहे, त्यांच्यावर कारवाई करणार आहे. शिवसेना कधीही संपणार नाही. बंडखोर आमदार जनतेचा सामना कसा करणार आहेत? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केला आहे. मध्यावधी निवडणुकांसाठी शिवसेना तयार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. व्हीपसंदर्भात जे काही उल्लंघन झाले त्याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. (Aaditya Thackeray on Eknath shinde Government)

सभागृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ज्यांनी बंडखोरी केलीये, जे पळून गेलेत त्यांना शिवसेना संपवायची आहे. मात्र शिवसेना कधी संपणार नाही. हे आमदार जेव्हा जनेतचा सामना करतील तेव्हा काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी इमारत कोसळली तेव्हा तेथील आमदार गुवाहाटीत पार्टी करत होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे ते म्हणाले की, आमदार अजूनही मतदार संघात गेलेले नाहीत. २० मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का असं विचारण्यात आलं होतं. ही घटना सत्य आहे. यासंबंधित वर्षावर बैठकही झाली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे जन्म पक्षात जे अस काही करु शकतात, ते कर्म पक्षातही हे नक्कीच होईल असं खात्रीलायक वक्तव्यही त्यांनी केलं आहे. त्यामुळे हे बंडखोर आमदार ज्या पक्षात गेलेत त्यांनी सावध रहावं असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT