Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari Esakal
महाराष्ट्र

Bhagat Singh Koshyari: अखेर राज्यपालांची गच्छंती होणार? स्वतःच व्यक्त केली इच्छा

सकाळ डिजिटल टीम

राज्यात एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंबधी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यातील राजकारण तापले आहे. एका कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, 'शिवाजी महाराज तो पुराने जमाने की बात है, अभी तुम्हारे सामने गडकरी जैसे आदर्श है. मला असं वाटतं, जर कोणी विचारलं तुमचे आदर्श कोण आहेत, तर बाहेर जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला मिळतील. शिवाजी तर जुने झाले, मी नवीनांबद्दल बोलतोय. आंबेडकरांपासून ते गडकरीपर्यंत इथेच मिळतील, असं ते म्हणाले आहेत. यावरून त्यांच्याविरोधात टीका करण्यात येत आहेत. तर त्यांना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

दरम्यान या सर्व घटनां घडत असतानाच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या राज्यात परत राज्याची इच्छा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी त्यांचा पदभार जवळच्या व्यक्तीवर सोपवावा असंही त्यांनी म्हंटलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पदमुक्त होण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त abp माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे.

राज्यपाल पदमुक्त होणार असल्याचे संकेत दिसत असून राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती मिळाली आहे. कोश्यारी यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे म्हंटलं जातय.

राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यातील वातावरण तापलं आहे. राज्यपालांच्या व्यक्तव्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले. भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. दरम्यान शिंदे गटानेही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती यांनीही राज्यपालांविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT