Bhagat Singh Koshyari sakal
महाराष्ट्र बातम्या

Bhagatsingh Koshyari : राज्यपालांच्या हकालपट्टीचा मुहूर्त ठरला!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यपालांमुळे भाजपाला फटका बसण्याची भीती आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. महाराष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता याचा मुहूर्तही ठरला आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक सध्या तोंडावर आली आहे. त्यामुळे केंद्रातलं भाजपा नेतृत्व सध्या तिकडे व्यस्त आहे. त्यामुळे कोश्यारींना काही वेळ मिळाला असल्याचं सांगण्यात येत आहे. सामच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर राज्यपाल कोश्यारी यांची उचलबांगडी होणार आहे.

हेही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात राज्यपालांविरोधात संतप्त भावना आहे. तसंच अनेक राजकीय नेत्यांनीही राज्यपाल कोश्यारींना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणूनच गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT