Chanakya Niti  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Chanakya Niti : महाराष्ट्र शासन देणार चाणक्य नितीचे धडे!

प्राचीन भारतीय विचारवंत चाणक्य यांचे तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी सेंटर स्थापन करण्याचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र शासन आर्य चाणक्य यांची राजनीती, अर्थव्यवस्था, राष्ट्रहित, युद्धनीती, जीवनपद्धती आणि विविध विचारांना प्रदर्शित करणार आहे. पुणे येथील लोणावळा येथील कार्ला येथे चाणक्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने प्राचीन भारतीय विचारवंत चाणक्य यांचे तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राचे पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार 'चाणक्य एक्सलन्स सेंटर' महाराष्ट्राच्या लोणावळ्याजवळील कार्ला येथे हे सेंटर सुरू होणार आहे.

चाणक्य यांचे कायद्याचे तत्त्वज्ञान, राजकारण, अर्थशास्त्र, प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे विषय या केंद्रामध्ये शिकवले जातील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

पर्यटक, शिक्षक आणि चाणक्य यांच्याबद्दल आणखी शिकण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सात दिवसांपर्यंतचे छोटे अभ्यासक्रम सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे, असे पर्यटन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

तिसर्‍या शतकातील प्रसिद्ध प्राचीन भारतीय विचारवंत, ज्याला ‘कौटालिया’ म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी उत्कृष्ट ‘अर्थ-शास्त्र’ लिहिले, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या राजकारण, वित्त आणि परराष्ट्र व्यवहारांवरील तत्त्वज्ञानावर चर्चा केली त्यांच्याबद्दल या सेंटरमध्ये शिकवले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! एकनाथ शिंदेंचे कौतुक, उद्धव ठाकरे गटाला धक्का; कारण सांगत ओमराजेंनी स्पष्ट केली भूमिका

IND vs IRE: सचिनचा ३६ वर्षांचा रेकॉर्ड मोडायला वैभव सूर्यवंशी सज्ज! आयर्लंड बोर्डाने सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेत दिला ग्रीन सिग्नल

Latest Marathi News Live Update : उमरगा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आक्रमक

Gram Panchayat Staff Pay: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या थेट वेतनासाठी पावसाळी अधिवेशनात जोरदार आवाज; बच्चू कडूंचे विधानभवनात विशेष बैठकीचे आश्वासन

विद्यार्थ्यांना त्रास नको म्हणून मोदींची संवेदनशीलता; NEET सुरू होईपर्यंत 45 मिनिटे विमानतळावर केली प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT