rajesh tope rajesh tope
महाराष्ट्र बातम्या

18 जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद- राजेश टोपे

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. सोमवारी राज्यात कोरोनाचे जवळपास 22 हजार रुग्ण सापडले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या स्थिरतेकडे जाताना दिसतेय.

कार्तिक पुजारी

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. सोमवारी राज्यात कोरोनाचे जवळपास 22 हजार रुग्ण सापडले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या स्थिरतेकडे जाताना दिसतेय.

मुंबई- असे असताना काही जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 18 जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या जिल्ह्यातील होम आयसोलेशन (home isolation) बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी या जिल्ह्यात कोविड सेंटरची संख्या वाढवली जाणार असल्याचं टोपे म्हणाले. पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नागपूर, सातारा, अमरावती, सिंधुदुर्ग, रायगड, वाशिम, बीड, गडचिरोली, उस्मानाबाद, अहमदनगर, अकोला, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद असणार आहे. (Maharashtra Health Minister Rajesh Tope government stop home isolation of patients in 18 districts)

राजेश टोपे पुढे म्हणाले की, 'राज्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट 93 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, तर पॉझिटिव्हिटी रेट 12 टक्क्यांच्या खाली आला आहे. सध्याच्या स्थितीत काही जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. अशा जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. अशा ठिकाणी जास्तीचे कोविड सेंटर उभारले जावे आणि तिथेच रुग्णांना आयसोलेट करण्यात यावे.'

उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची आज बैठक घेण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. यावेळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे 2245 रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने या आराजाला नोटीफाईट घोषित केलं असून प्रत्येक रुग्णांची नोंद केली जाणार आहे. सर्व हॉस्पिटलला अशा रुग्णांची माहिती सरकारला देणे बंधनकारण करण्यात आलंय. तसेच राज्यात सर्व हॉस्पिटलचे फायर ऑडिड करण्यात येणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, राज्यात सुरु असलेला लॉकडाउन संपणार की आणखी वाढणार? याबाबत नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्हे आहेत. मागील काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांत लॉकडाउनसंदर्भात विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी लॉकडाउनबाबत महत्वाचं विधान केलं आहे. लॉकडाउनचा निर्णय शुक्रवारी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर घेतला जाणार आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षत्येखाली होणाऱ्या बैठकीत राज्यातील लॉकडउनची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

SCROLL FOR NEXT