Maharashtra Rain  
महाराष्ट्र बातम्या

MH Rain Update: मुंबईसह 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट, 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; कुठे शाळा बंद? तुमच्या जिल्ह्याची स्थिती जाणून घ्या

Maharashtra Heavy rain Update: मुंबई, ठाण्यामध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू आहे. पण, लोकल रेल्वे दोन ते तीन मिनिट उशिराने धावत आहेत.

कार्तिक पुजारी

Maharashtra Rian Update: मुंबईत सोमवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसाने आज विश्रांती घेतली आहे. मात्र, ढगाळ वातावरण कायम आहे. मुंबईसह सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी या राज्यांना रेल अलर्ट जारी झालाय. या जिल्ह्यात प्रशासन सतर्क झाले असून त्यादृष्टीने काम केले जात आहे. मुंबईतील पावसाचा विमानसेवेला देखील फटका बसला आहे. ५० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय फ्लाईट रद्द करण्यात आले आहेत.

मुंबई, ठाण्यामध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू आहे. पण, लोकल रेल्वे दोन ते तीन मिनिट उशिराने धावत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी मुसधळार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१२ वी पर्यंत शाळांना सुट्टी

पावसाच्या शक्यतेमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे, रायगड, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई या जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काही अघटित घडू नये यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.

पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर,गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये मुसळधार ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे.

कुठे पावसाचा रेड अलर्ट?

मुंबई, नवी मुंबई, पुणे, सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी या राज्यांना रेल अलर्ट

ऑरेज अलर्ट कुठे?

पालघर, ठाणे, अमरावती, अकोला, यवतमाळ

कुठे शाळा बंद?

पुणे, रायगड, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT