Maharashtra Local Body Election esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील 105 नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान

सकाळ डिजिटल टीम

राज्यात आज 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान होत आहे.

राज्यात आज जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad Election) 39, तर पंचायत समितीच्या (Panchayat Committee) 79 निर्वाचक गणांसाठी मतदान होत आहे. एकूण, 7 लाख 68 हजार 866 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 1322 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. शिवाय, आज 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायत निवडणुकांसाठीही (Nagar Panchayat Election) मतदान होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय (OBC Political Reservation) ही निवडणूक पार पडत आहे.

आज एकूण 7 लाख 68 हजार 866 मतदार मतदान करतील, त्यापैकी 3 लाख 89 हजार 130 पुरुष, तर 3 लाख 79 हजार 736 महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा परिषदेसाठी एकूण 245 उमेदवार नशिब आजमावत असून पंचायत समितीसाठी 417 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या 245 उमेदवारांपैकी 109 स्त्री, तर 136 पुरुष उमेदवार आहेत. शिवाय, पंचायत समितीसाठी 417 उमेदवारांपैकी 228 पुरुष, तर 189 स्त्री उमेदवार आहेत.

'या' नगरपंचायतीत कांटे की टक्कर

मंडणगड, दापोली (रत्नागिरी), कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ ( सिंधुदुर्ग ), देहू (पुणे-नवनिर्मित नगरपंचायत), लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी ( सातारा ), कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ (सांगली), तर, सोलापूरमधील माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित नगरपंचायत), वैराग (नवनिर्मित नगरपंचायत), नातेपुते (नवनिर्मित नगरपंचायत) या निवडणुकींकडे राज्याचे लक्ष आहे. भंडारा गोंदिया जिल्हा परिषद, तसेच पंचायत समिती नगरपंचायतीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या 39 जागासाठी पंचायत समितीच्या 79 जागा, तर नगर पंचायतीच्या 39 जागासाठी, तर गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 43 जागा नगरपंचायतीच्या 86 जागा, तर पंचायत समितीच्या 45 जागांसाठी हे मतदान होत आहे.

राज्यातील 'या' नगरपंचायतीसाठी मतदान

  • सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी

  • सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ

  • ठाणे- मुरबाड व शहापूर,

  • पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा,

  • रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली,

  • रत्नागिरी- मंडणगड, दापोली,

  • सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ,

  • पुणे- देहू

  • सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग, नातेपुते

  • नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा,

  • धुळे- साक्री,

  • नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ,

  • अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी,

  • जळगाव- बोदवड

  • औरंगाबाद- सोयगाव

  • जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी

  • परभणी- पालम,

  • बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी,

  • लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ,

  • उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु.,

  • नांदेड- नायगाव, अर्धापूर, माहूर,

  • हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ,

  • अमरावती- भातकुली, तिवसा,

  • बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा,

  • यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी,

  • वाशिम- मानोरा,

  • नागपूर- हिंगणा, कुही,

  • वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर,

  • चंद्रपूर- पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरा,

  • गडचिरोली- एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड

  • भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर,

  • गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, सावली.

नगरपालिका पोटनिवडणूक

सिल्लोड, फुलंब्री, शिरोळ, नागभीड, जत, वानाडोंगरी आणि ढाणकी या नगरपरिषदांमधील रिक्त जागांची पोटनिवडणूक होणार आहे. नगरपंचायत निवडणुकीसोबत मिरज, सांगली, कुपवाड, अहमदनगर व धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक देखील होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT