The Maharashtra government announces a local holiday on the occasion of Narali Pournima and Gauri Visarjan; college exams in Mumbai postponed due to the festive observance.  esakal
महाराष्ट्र बातम्या

Narali Pournima and Gauri Visarjan Holiday : राज्य सरकारने नारळीपौर्णिमा अन् ज्येष्ठगौरी विसर्जनानिमित्त स्थानिक सुट्टी केली जाहीर, मात्र...

Maharashtra declares local holiday for Narali Pournima and Gauri Visarjan: मुंबईतील महाविद्यालयांच्या उद्या होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या

Mayur Ratnaparkhe

Maharashtra Government Declares Local Holiday: राज्य शासनाकडून एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आता दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी ऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठगौरी विसर्जनाच्या दिवशी मुंबई शहरासह उपनगरातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. राज्य सरकारच्या डीजीआयपीआर विभागाकडून याबाबतचे परिपत्रक काढले गेले आहे.

तर नारळीपौर्णिमेमुळे शुक्रवारी ८ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर झाल्याने, मुंबईतील सर्व कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या महाविद्यालयीन आणि फार्मसी तसेच डिस्टन्स लर्निंग व ऑनलाइनच्या शुक्रवार ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

तसेच परीक्षांची पुढील तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे सर्व महाविद्यालयांना देण्यात आली आहे.

राज्य सरकारने यंदा गोपालकाला आणि गणपती विसर्जन या दोन्ही दिवशी राज्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी दिलेली नाही. त्याबाबतचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केले आहे. सध्या हे आदेश केवळ मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यासांठी लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे यावर आता काय प्रतिक्रिया उमटतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तर सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार, सन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) (दिनांक १६ ऑगस्ट, २०२५) व अनंत चतुर्दशी (दिनांक ६ सप्टेंबर, २०२५) या ऐवजी नारळी पौर्णिमा (दिनांक ८ ऑगस्ट, २०२५) व ज्येष्ठगौरी विसर्जन (दिनांक २ सप्टेंबर, २०२५) निमित्ताने स्थानिक सुट्टी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय / निमशासकीय कार्यालयांना जाहीर करण्यात आली आहे.

तसेच हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/ निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार आहेत. वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी अॅन्ड एस. नंबर पी-१३/II/बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार जाहीर करण्यात येत असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने कळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

I.N.D.I.A Alliance Meeting Update: राहुल गांधींच्या निवासस्थानी पार पडलेल्या I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीत झाले मोठे निर्णय!

Maharashtra Election Commission: निवडणुकीत घोळ झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपावर, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने पाठवलं पत्र अन् म्हटलं...

UPI Down! गुग-पे, फोन-पे, पेटीएम सेवा कोलमडली, नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

kapil sharma : कपिल शर्माच्या कॅनाडातील कॅफेवर पुन्हा गोळीबार....लॉरेंस बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी...पुढचा हल्ला मुंबईत करण्याचीही धमकी

Sanju Samson ने राजस्थानची साथ सोडल्यास कॅप्टन कोण?

SCROLL FOR NEXT