maharashtra monsoon assembly session cag report praises ajit pawar agriculture sector growth during pandemic  sakal media
महाराष्ट्र बातम्या

CAG Report : विधानसभेत कॅगचा अहवाल सादर, कृषी क्षेत्रानं अर्थव्यवस्था तारली

सकाळ डिजिटल टीम

CAG Report : विधानसभेत मागील काही दिवसांपासून पावसाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. मागील पाच दिवस वादळी ठरले आहेत. दरम्यान आज विधानसभेत कॅगचा अहवाल सादर करण्यात आला. दरम्यान या आहवालात कोरोना महासाथीच्या काळात राज्याची अर्थव्यवस्था मंदावलेली असताना देखील कृषी क्षेत्राने चांगली कामगिरी केल्याचे म्हटले आहे.

या काळात राज्याचा जीडीपी तीन टक्क्यांनी घसरला असल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. कोरोनाची परिस्थिती, लॉकडाऊन आणि टप्प्याटप्प्याने निर्बंध हटवल्याने आर्थिक घडामोडी वर याचा परिणाम झाल्याचेही नमुद करण्यात आले आहे. तर कोरोना काळामध्ये राज्याला कृषी क्षेत्रांनी तारल्याचे हा अहवाल सांगतो. कृषी क्षेत्र एकमेव असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये सकारात्मक काम झाले. जीडीपीत कृषी क्षेत्राचे 11 टक्क्यांचे योगदान आहे. कृषिक्षेत्राने या संकटाच्या काळात राज्याच्या अर्थव्यवस्थेला तारल्याचे या रिपर्टमध्ये म्हटले आहे.

कॅगच्या रिपोर्टमध्ये राज्यावरील कर्ज 2016-17 या वर्षात चार लाख कोटी इतके होते ते वाढून पाच लाख 48 हजार 176 कोटी इतकं झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत राज्याचा कर महसूल 13.7 टक्क्यांनी घसरला आहे. वर्ष 2019-20 मधील महसूल दोन लाख 83 हजार 189.58 कोटी इतका होता.

तर वर्ष 2020-21 मध्ये महसूल दोन लाख 69 हजार 468.91 कोटींवर घसरला. तर जीएसटीमध्ये 15.32 टक्क्यांनी घसरण झाली. तर, व्हॅटमध्ये 12.24 टक्क्यांनी घट झाली असल्याचे कॅगने म्हटले. राज्य सरकारचे कर्जावरील व्याज, वेतन आणि निवृत्ती वेतन यावर एकूण महसुली खर्चाचा 57.33 टक्के इतका भाग खर्च झाला आहे. महसुली खर्चात घट झाल्यामुळे 41 हजार 141.85 कोटींची महसुली तूट झाली आहे.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राजकोषीय तूटदेखील तीन टक्क्यांहून करण्यास यश मिळवले असल्याचे कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे. तसेच कॅगच्या रिपोर्टमध्ये राज्याचे तात्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांचे आर्थिक शिस्तीसाठी कौतुक केले आहे. या आहवालात दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2020-21 मध्ये राजकोषीय तूट तीन टक्यांहून खाली आणण्यास राज्य सरकारला यश मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT