maharashtra police recruitment 2022 maharashtra police bharti for 7 thousands vacancies soon  
महाराष्ट्र बातम्या

राज्यात लवकरच पोलिस भरती; भरली जाणार 7 हजार पदे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पोलिस सेवेत दाखल होण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या तरूणांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, महाराष्ट्र पोलिसात लवकरच 7 हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. (Maharashtra police recruitment 2022)

राज्यात पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी ही भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पहिल्या टप्प्यात 7 हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील 416 पदे तातडीने भरण्यास गृह विभागाने मान्यता दिली होती. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्य़ानंतर पोलिस अधीक्षकांना ही रिक्त पदे भरण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार दीडशे पोलीस शिपाई, 161 पोलीस शिपाई चालक आणि 105 सशस्त्र पोलिसांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT