Sanjay Raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: 'वक्त जरूर बदलता है' शिंदे गटाच्या १६ आमदारांचं काय होणार? राऊतांचं सूचक ट्विट

कोर्टाने पुढे ढकलली सुनावणी

रुपेश नामदास

सध्या महाराष्ट्र, देशातील सर्वात असुरक्षित राज्य असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. खरी शिवसेना कोणाची? यावर गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्ष दिसून येत आहे. सत्तासंघर्ष निर्णयक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.

या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे. सुनावणीपूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधताना महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वात असुरक्षित राज्य असल्याचे म्हटले आहे. त्याच्या या वाक्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.

दरम्यान सुनावणीपूर्वी संजय राऊत यांनी एक शेर ट्विट केले आहे. 'मन मे हमेशा जीत की आस होनी चाहिए... नसीब बदले या ना बदले,वक्त जरुर बदलता है', अशा मजकूराचा हा शेर आहे. कोर्टाकडून अपेक्षित अशा गोष्टी घडणार का हे पाहवं लागणार आहे.

मात्र सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे. सत्तासंघर्ष प्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे.

यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागच्या सुनावणीवेळी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT