Sharad Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena Case: सत्ता संघर्षाच्या निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; नैतिकता अन् भाजप हे...

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टानं आज अंतिम निकाल दिला. यामध्ये एकनाथ शिंदेंच सरकार कायम राहिल असं म्हटलं पण राज्यपालांच्या भूमिकेवर कोर्टानं ताशेरे ओढले. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नैतिकता आणि भाजप यांमध्ये विरोधाभास असल्याची टिप्पणी त्यांनी केली. (Maharashtra Political crisis Sharad Pawar first reaction Ethics and BJP are contradictory)

पवार म्हणाले, शिवसेनेचा संसदीय पक्ष अद्याप फायनल नाही. त्यामुळं ज्या राजकीय पक्षाच्या जोरावर लोक निवडणूक लढवतात, निवडून येतात त्या पक्षाचा आदेश हा महत्वाचा आहे, हे कोर्टानं आपल्या निर्णयात सांगतलं आहे.

कोर्टानं अध्यक्षांवर अपात्रतेचा महत्वाचा विषय सोपवला आहे. बघुयात यावेळी अध्यक्ष कुठली भूमिका घेतात. कोर्टाचा निकाल ज्या कालावधी संदर्भातील आहे, यावर ते निर्णय घेतील. पण यासाठी त्यांच्यासमोर आमचं म्हणणं मांडण्याचं काम केलं जाईल. विधानसभा अध्यक्ष हे पद एक इन्स्टिट्यूशन आहे आणि याची जबाबदारी ज्याच्यावर असते त्यानं याचं पावित्र दाखवावं लागतं. पण यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही.

हल्ली माझं एक पुस्तक प्रकाशित झालं यामध्ये हा विषय आहे यामध्ये मी स्पष्टपणे म्हटलं आहे. यामुळं आमचे काही मित्र नाराज होते, पण ती वस्तुस्थिती होती त्यावर आज सुप्रीम कोर्टानंही भाष्य केलं आहे. नैतिकता आणि बीजेपी यामध्ये विरोधाभास आहे, त्यामुळं यावर काय मत द्यायचं.

राज्यपाल इथं असताना त्यांचा एकंदर अनुभव घेतल्यानंतर मी म्हटलं होतं की, "घटनेत राज्यपाल ही एक संस्था आहे. त्या इन्स्टिट्युशनची अप्रतिष्ठ कशी केली जाते याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रात त्या काळात पहायला मिळालं होतं. सुदैवानं आज ते इथं नाहीत त्यामुळं जास्त भाष्य करणं योग्य नाही, असंही पवार यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर बोलताना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT