Shivsena case
Shivsena case  
महाराष्ट्र

Shivsena case : शिंदेंचा विजय मात्र उद्धव ठाकरेंसाठी निकालातील 'या' आहेत पॉझिटिव्ह गोष्टी

धनश्री ओतारी

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्रातील सत्तांतराच्या प्रकरणी घडलेल्या अनेक घडामोडींवर ताशेरे ओढले आहेत पण महाराष्टात शिंदे- फडणवीस सरकार वाचलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने आपण त्या सत्तांंतराच्या घडामोडींमधून आधीचे सरकार वाचवू शकत नसल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंची भूमिका काय असणार? त्यांच्या हातात कोणत्या गोष्टी आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.( Uddhav Thackeray positive points Supreme Court cji chandrajud decision)

एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळाला असला तरी उद्धव ठाकरे यांच्याकडे निकालातील काही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत.

कोणत्या गोष्टी पॉझिटीव्ह?

प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्याची मागणी मान्य.

गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर.

फुटलेला गट बचावासाठी मूळ पक्ष असल्याचा दावा करु शकत नाही.

 महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात वारंवार उल्लेख करण्यात आलेले नबाम रेबिया प्रकरण मोठ्या खंडपिठाकडे वर्ग करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला काहीसा दिलासा मिळाला.

अध्यक्षानी केवळ राजकीय पक्षाच्या व्हीपलाच मान्यता द्यायला हवी. त्यामुळं भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदा असल्याचं कोर्टानं म्हटलं.

दहाव्या सुचीनुसार पक्षांर्गत फुटीला कोणताही अधिकार नाही, त्याला अर्थ नाही. कुठलाही गट पक्षावर दावा करु शकत नाही. या निकालामध्ये तिसरे महत्वाचे आहे. ते राज्यपालांबाबत आहे. बहुमत चाचणी बोलावण्यासाठी आलेली बैठक वैध नाही. कारवाई करण्यासाठी केलेला युक्तिवाद पळपुटा, राज्यपालांना कोर्टानं झटका दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT