arjun khotkar esakal
महाराष्ट्र बातम्या

अर्जून खोतकर ३१ जुलैला शिंदे गटात प्रवेश करणार?

धनश्री ओतारी

शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आता माजी आमदार तथा शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांची भर पडली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, अर्जून खोतकर शिंदे गटात ३१ जुलैला प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (maharashtra politics crisis arjun khotkar joins shinde)

दरम्यान, तत्कालीन ठाकरे सरकरमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत खोतकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदे गटातील प्रवेशाबाबत उद्या म्हणजेच ३० जुलैला निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले.

चार दिवसांपूर्वी खोतकर दिल्लीत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यांनतर अखेर खोतकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. खोतकर हे मराठवाड्यातील शिवसेनेचे महत्वाचे नेते समजले जातात. त्यामुळे त्यांनी जर बंडखोरी केली तर शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर खोतकर आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचे काही फोटो सुद्धा समोर आले आहेत.

मात्र, अद्याप खोतकरांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही.

अशातच सत्तार यांचे नाव नव्या मंत्रींडळाच्या यादीतून वगळल्याची चर्चा सुरू झाली आहे. सत्तार हे शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे सत्तार यांना मंत्रीपद मिळणार की नाही, यावर तर्कवितर्क लावले जात आहे. मात्र मंत्रीमंडळाच्या यादीतून नाव वगळल्याची कुणकुण सत्तार यांना लागल्यामुळेच ते दिल्लीत दाखल झाल्याची चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Government Employees Salary : केंद्रीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांना दिलासा; २५ सप्टेंबरलाच वेतन-पेन्शन जमा होणार

Bank Update: रविवारीही बँका राहणार सुरू! सरकार आणि RBIचा मोठा निर्णय

Mumbai News: गणेश विसर्जनाला मोठी गर्दी होणार! मुंबईतील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, मेट्रो सेवेतही बदल; वाचा सविस्तर

गणपती विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; दीपक वागसकर यांचा मृत्यू, कार्यकर्त्यांचा पोलिसांवर आरोप | Ahilyanagar, Bhingar

Vivo Smartphone: 10,000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्लेसह येतोय Vivo S2 FE 5G; पाहा दमदार फीचर्स अन् किंमत...

SCROLL FOR NEXT