(maharashtra politics major changes Eknath Shinde alliance Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

युतीसरकारमध्ये होणार मोठे फेरबदल, रात्रीस खेळ चाले; २ वाजता शिंदे फडणवीस दिल्लीहून मुंबईत दाखल

युतीसरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता

धनश्री ओतारी

आगामी लोकसभा व त्या पाठोपाठ होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर युतीसरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, जुलैच्या पहिल्या आठवड्यात केंद्रापाठोपाठ राज्याचाही मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता दरम्यान, अकार्यक्षम मंत्र्यांसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. (maharashtra politics major changes Eknath Shinde alliance Devendra Fadnavis )

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला दौऱ्यावर गेले होते. तिथे अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठक झाली असल्याचे सांगण्यात येत आहेत. मात्र, दोघोही रात्रीच म्हणजेच २ च्या सुमारास मुंबई परतले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

केंद्रापाठोपाठ राज्यातही अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन त्या जागी नवीन चेहरे देण्यावर युती सरकारचा भर देणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळातील भाजपच्या महाराष्ट्रातील २ अकार्यक्षम मंत्र्यांच्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यात एक कॅबिनेट, तर एक राज्यमंत्री पद असून त्या जागी कोणाची वर्णी लावायची हा निर्णय शिंदेंवर सोडलेला असल्याचे समजते. त्यामुळे महाराष्ट्रात मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांनी लाॅबिग करण्यास सुरूवात केल्याचे कळते. मात्र निवडणुकांच्या तोडांवर सरकारची इमेज बदलण्यासाठी तरुण-तडफदार नेत्यांना केंद्रात व राज्यात संधी देण्याची शक्यता वर्तवण्यत येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT