Students 
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी: दहावी-बारावी बोर्ड परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा!

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra SSC HSC board exams 2021:​ पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे २०२१मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान, तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये, विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतुने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी व्हावा, या दृष्टीने एप्रिल-मे २०२१च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.

या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. तसेच अन्य यंत्रणेने छपाई केलेले आणि व्हॉट्‌सॲप किंवा सोशल मिडियाद्वारे व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT