maharashtra state Cabinet expansion after 21st December 
महाराष्ट्र बातम्या

सहा मंत्रीच चालवणार अधिवेशन; 'या' तारखेनंतर होणार मंत्रिमंडळाचा विस्तार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 21 डिसेंबरनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून नागपूरचे हिवाळी अधिवेशन सहा मंत्र्यावरच चालवण्यात येणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीत मंत्रीपदाचे वाटप निश्‍चित झालेले असले तरी खातेवाटपाची चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे उपमुख्यमंत्रीपदासाठी नेत्याचे नाव अंतिम झालेले नाही. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर पडणार हे स्पष्ट झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

दरम्यान, कॉंग्रेसने पक्षश्रेष्ठीकडून मंत्रीपदे व मिळणारी खाती यावर सहमती मिळवली आहे. कॉंग्रेसकडून मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्यांची यादी देखील तयार आहे. मात्र, राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांनाच आग्रह केला असून त्यांचे मन वळवण्याची तयारी सुरू आहे. अजित पवार पक्षाच्या कामात सक्रिय झाले असले तरी मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत ते अद्‌याप तयार नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, पक्षातील सर्व नेते व आमदार यांना अजित पवार मंत्रीमंडळात हवे असून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत.

नागपूर येथे 16 डिसेंबरपासून या महाविकास आघाडी सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. केवळ पाच दिवस हे अधिवेशन सुरू राहणार असून सहा मंत्र्यावरच कामकाज उरकण्याचा भार राहणार आहे. विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहात या सहा मंत्र्यानाच विरोधकांचा सामना करावा लागेल.

काय घडलं बैठकीत ज्यानंतर अजित पवारांनी केलं बंड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्यांच्या समोर विरोधी पक्षाचे आव्हान आहे. या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी 1978 ला पुलोद आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर केवळ चार मंत्र्यावरच हिवाळी अधिवेशन घेतले होते. त्यामुळे, दोन्ही सभागृहाचे कामकाज करण्यात या सहा मंत्र्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT