Money Google
महाराष्ट्र बातम्या

केंद्रापाठोपाठ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही भेट; महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ

राहणीमानाचा स्तर कायम राखण्यासाठी महागाई भत्ता देण्यात येतो.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: केंद्रीय कर्मचारी (Central government employees) आणि निवृत्तीवेतन धारकांसाठी (Pensioners) महागाई भत्त्यामध्ये (Dearness allowance Hike) ३ टक्क्यांनी वाढ मिळण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना (State government employees) देखील तीन टक्के अधिक महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १ जुलै, २०२१ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर २८ टक्क्यांवरु ३१ टक्क्यांवर नेला असल्याचेही सांगण्यात आले आहे.

राहणीमानाचा स्तर कायम राखण्यासाठी महागाई भत्ता देण्यात येतो. देशात सर्वप्रथम १९७२ मध्ये मुंबईत महागाई भत्ता देण्यात आला होता. दरम्यान आज केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

३ टक्क्यांची वाढ निश्चित करण्यात आली

दरम्यान केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना आता ३४ टक्के दराने महागाई भत्त्यामध्ये(DA Hike) मिळणार आहे. डिसेंबर २०२१ साठी औद्योगिक कामगारांसाठी All-India Consumer Price Index -AICPI एका अंकाने घसरला आहे. महागाई भत्त्याच्या १२ महिन्यांच्या निर्देशांकाची सरासरी ३४.०४% (Dearness allowance) सह सरासरी ३५१.३३ आहे. परंतु, महागाई भत्ता नेहमी पूर्ण संख्येने दिला जातो. म्हणजेच जानेवारी २०२२ पासून एकूण महागाई भत्ता ३४% असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT