महाराष्ट्र बातम्या

मॉल, रेस्टॉरंट रात्री दहापर्यंत खुले, मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर राज्य निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मॉल, रेस्टॉरंट, दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत आणि खासगी कार्यालयांना २४ तास खुली ठेवण्याची मुभा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असणे सक्तीचे करण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेचे स्वरूप दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक असण्याचा अंदाज केंद्रीय आरोग्य विभागाने वर्तविला असल्याने राज्याची ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेऊन ७०० टन ऑक्सिजनची गरज जेव्हा राज्याला भासेल तेव्हा तातडीने राज्यात लॉकडाउन केला जाणार असल्याचा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्यात सर्वच जिल्ह्यांमधील निर्बंध सरसकट उठविताना लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक असणे सक्तीचे करण्यात येणार असल्याची माहिती टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉलना रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. उपाहारगृहांना त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत मान्यता देण्यात आलेली आहे. खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळे आहेत, तेथे जास्तीत जास्त २०० संख्येची परवानगी असेल आणि हॉलमध्ये जी आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीनिशी परवानगी देण्यात आलेली आहे मात्र ही मर्यादा १०० या पेक्षा जास्त असणार नाही.

खासगी आस्थापनांना २५ टक्के उपस्थितीसह २४ तास कार्यालये खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले. एकाच वेळी सर्व कर्मचाऱ्यांना बोलावण्यापेक्षा वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये कर्मचाऱ्यांना बोलावले जावे अशी यामागची कल्पना असल्याचे टोपे म्हणाले.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, उपनगरी गाड्यांबाबत आता डबल डोस आणि दुसऱ्या डोस नंतरचे १४ दिवस झालेले असणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींना प्रवास करण्यास परवानगी असणार आहे. त्यामध्ये त्याचे स्वतःचं ओळखपत्र आणि डबल डोस घेतल्याचे प्रमाणपत्र हे जर त्या ठिकाणी दाखविले तर, मासिक आणि त्रैमासिक पासेस देण्याच्या सूचना रेल्वे विभागाला देण्यात आलेल्या आहेत. नियम न पाळणाऱ्यांना ५०० रुपये दंड व कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते.

महत्त्वाचे निर्णय

- दुकानांच्या वेळाही रात्री १० वाजेपर्यंत वाढविल्या

- मॉलमध्ये जाण्यासाठी लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस होणे आवश्यक

- धार्मिक स्थळे, मंदिर आणि प्रार्थनास्थळे बंद

- चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे बंदच

- इनडोअर खेळांसाठी सर्व खेळाडू व कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस झाले असतील तरच परवानगी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT