महाराष्ट्र बातम्या

सकाळी 10 : युती सत्तेत, तर आघाडीचेही शतक | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (गुरुवार) सकाळपासून सुरू झाली असून, सुरवातीच्या कलानुसार भाजप-शिवसेना महायुती सत्तेत गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर, महाआघाडीने शतक पूर्ण केल्याचेही दिसत आहे. महायुतीने सुमारे 176 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, महाआघाडी 100 जागांवर पुढे असल्याचे चित्र आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षांतर करून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केल्याने यंदाची विधानसभा निवडणूक गाजली आहे. काही अपवाद वगळता यापैकी सर्व "आयारामां'ना सत्ताधारी पक्षांनी उमेदवारी दिली आहे, त्यामुळे या जागांच्या निकालाकडे लक्ष होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील माजी मंत्री नशीब अजमावत आहेत. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील सुरक्षित कोथरूड मतदारसंघ निवडल्याने सुरवातीला त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला होता, त्यामुळे या मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष आहे. 

वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात उतरविल्याने ही लढत महत्त्वपूर्ण ठरली आहे. 

बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील लढत मराठवाड्यासह राज्यासाठी लक्षवेधी ठरली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने वरळी मतदारसंघाचा निकाल औत्सुक्‍याचा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: पुणे जिल्ह्यात दाेन दिवसांपासून अवकाळीने शेतीचे नुकसान: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अँक्शन मोडवर, तातडीने पंचनाम्याचे निर्देश!

Dhurandhar 2 ने पहिल्याच दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला, बॉलिवूडच्या ओपनर सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडले

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

SCROLL FOR NEXT