Politics
Politics 
महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : दसऱ्यानंतर रंगणार प्रचाराचा फड

सकाळ न्यूज नेटवर्क

विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला दसऱ्याच्या सणानंतर रंग भरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सात ऑक्‍टोबर ही शेवटची तारीख आहे, तर येत्या सोमवारी म्हणजे ८ तारखेला दसरा सण आहे. यानंतर राज्यात प्रचाराचे रण तापणार आहे. विविध राजकीय पक्षाचे स्टार प्रचारक पुढील दोन आठवडे राज्यात प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत.

दरवर्षी मुंबईत शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यात शिवसेनेचे प्रमुख शिवसैनिकांना आवाहन करत असतात. यंदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बीड जिल्ह्यातील भगवान भक्ती गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. भगवान गड हे राज्यातील वंजारी समाजाचे श्रद्धास्थान आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे हे हा याच गडावरून राजकीय घोषणा करत. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर वंजारी समाजाचे राजकारण त्यांच्या कन्या पंकजा मुडे आणि पुतण्या धनंजय मुंडे यांच्याभोवती केंद्रित झाले आहे. पंकजा मुंडे यांनी थेट शहा यांना गडावर पाचारण केले आहे. या वेळी अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT