Maharashtra Weather Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather : आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज, बळीराजाच्या चिंतेत वाढ

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. राज्यातील अनेक भागामध्ये गारपीठ झाली आहे. तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. कारण अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. तर राज्यात आजही वर्तवलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. 20 मार्चपर्यंत म्हणजे आणखी पुढचे तीन दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर परभणी जिल्ह्यात वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

20 मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजही मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता अधिक जाणवत आहे. तर मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, परभणी जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा, परभणी, गंगाखेड तालुक्यात अवकाळी पाऊस झाला आहे. वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गंगाखेड तालुक्यातील उखळी येथील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बाळासाहेब बाबुराव फड (वय 60), परसराम गंगाराम फड (वय 40) अशी मृतांची नावे आहेत. तर परभमी तालुक्यातही दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर राहीबाई बाबुराव फड (75 वर्षे), सतीश सखाराम नरवाडे (29 वर्षे), राजेभाऊ किशन नरवाडे (35 वर्षे) हे जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सलमान खानच्या आजोबांना मिळालेला जमिनीत गाडलेला खजिना; त्यांनी त्या पैशांचं काय केलं? सरकारला न देता सरळ...

Bee Attack on Cricket Match : क्रिकेट सामन्यात मधमाशांचा हल्ला!, १० मिनिटांत ५० हून अधिक मधमाशांनी 'डंख' दिल्याने ‘अम्पायर’चा मृत्यू

Zimbabwe Cricket : सर्व अपराजित संघ एकाच 'ग्रुप'मध्ये! श्रीलंकेला नमवून झिम्बाब्वेने नोंदवले '७' विक्रम; भारताविरुद्ध सामना कधी?

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांचा राजीनामा! भावनिक पोस्ट करत शेअर केला २३ वर्षांचा प्रवास

Latest Marathi News Live Update : अमरावतीत महिन्याभरात तिसऱ्यांदा एमडी ड्रग्स जप्त

SCROLL FOR NEXT