Maharashtra Weather Update e sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात थंडी वाढणार, मुंबईत पारा आणखी घसरण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यभरात अचानक पाऊस पडल्याने हवेत गारव निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसभात राज्यभरात किमान तापमान कमी होऊन थंडी (Maharashtra Weather Forecast) वाढण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागानं (IMD) अंदाज व्यक्त केला आहे. तसेच मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा सर्वाधिक प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)

पाकिस्तान व गुजरात येथील धूलीकण घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे रविवारी मुंबईतील अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला. हवेत मोठय़ा प्रमाणावर धूलिकण साचल्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. गेल्या दहा वर्षांतील मुंबईत सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद रविवारी झाली. सहा ते सात अंशानी कमाल तापमानात घट झाली होती. मुंबईसह राज्यभरात अचानक झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून कमी झालेली थंडी अचानक वाढणार आहे. येत्या दोन दिवसात राज्यभरात किमान तापमान कमी होऊन थंडी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather Forecast Temperature May Decreased Due to Rain)

आज किमान तापमानात घट होऊन पुणे, नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात सर्वाधिक थंडी जाणवेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं जारी केला आहे. तसेच काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरात १४ डिग्रीच्या खाली तापमान घसरण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT