rain sakal
महाराष्ट्र बातम्या

येत्या काही तासांत राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : येत्या २ ते ३ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावासाची (Maharashtra Weather Update) शक्यता आहे. यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश असून हवामान विभागाने (IMD) हा अंदाज वर्तविला आहे.

नोव्हेंबर महिन्यात राज्यात कडाक्याची थंडी असते. मात्र, दिवाळीनंतर दोन ते तीन दिवस थंडीची चाहूल लागली. त्यानंतर सतत ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे थंडी देखील कमी झाली आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तसेच गेल्या २४ तासांत कोकणासह राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली होती. विदर्भात देखील पावसाच्या सरी बरसल्या होत्या. आज येत्या २ ते ३ तासांत कोकणासह राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, पालघर, नाशिक, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावासाची शक्यता आहे. याबाबत हवामाने विभागाने ट्विट करून माहिती दिली आहे.

राज्यात सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फायदा होत आहे, तर फळबागांना मात्र धोका आहे. सोलापूर जिल्ह्यात गेले दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हलक्‍या सरी येत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण झालेले असते. या अवकाळी पावसामुळे तालुक्‍यातील द्राक्षांबरोबरच डाळिंब बागांना मोठा फटका बसला आहे. सतत पडणारा हलक्‍या पावसाच्या सरीमुळे द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घडकुज होत असल्याने द्राक्ष बागांची मोठी हानी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : पुणे तापमानात होतयं उणे, राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार; ४ दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Sangli Crime : सांगलीत चाललंय काय? जतमध्ये नग्नावस्थेत तोंड, डोके ठेचून तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात गंभीर जखमा

Latest Marathi News Live Update : राज्यातील २४ नगरपरिषदांसाठी आज मतदान; कर्मचारी पोहोचले मतदान केंद्रांवर

Air Pollution : वाकड, रावेतला प्रदूषणाचा विळखा; आरएमसी प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची 'तस्करी'मध्ये एन्ट्री; इम्रान हाश्मीसोबत शेअर करणार स्क्रीन

SCROLL FOR NEXT