Maharashtra Weather Update sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात ३ दिवस गारपिटीसह पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना अलर्ट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात पुढील तीन दिवसांत विजांच्या कडकडाटासह गारपिट आणि पावसाची (Vidarbha-Marathwada Rain Update) शक्यता आहे. याबाबत हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला असून मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमानात घट होण्याची देखील शक्यता आहे.

आजदेखील विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं. भंडारा, चंद्रपूरमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. तसेच नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. नागपूरकरांना सूर्याचं दर्शन देखील झालं नाही. आता येत्या १३ जानेवारीपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. तसेच इतर भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट -

आज मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदडे, तर विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि नागपूरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ११ ते १३ जानेवारीपर्यंत पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तरेकडील पश्‍चिमी चक्रावात, अरबी समुद्रातून होत असलेला बाष्प पुरवठा त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातून येणारे वारे यांच्या प्रभावामुळे राज्यात पावसाचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवड्याला पावसानं झोडपून काढले आहे. अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात गारपीट झाली. त्यामुळे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मृगाचा संत्रा देखील गळून पडला आहे.

थंडीही वाढणार -

पावसाबरोबरच नागरिकांना कडाक्याच्या थंडीचाही सामना करावा लागणार आहे. कारण, मध्य महाराष्ट्रात तापमान २-३ अंश घसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असून त्याचा परिणाम विदर्भावर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

स्टार प्रवाहच्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतून एक- दोन नाही तब्बल ४ जणांची एक्झिट; कारण काय?

No Signal in Lift Reason : तुम्ही लिफ्टमध्ये शिरताच तुमचं मोबाईल नेटवर्क का गायब होतं? याचे कारण जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : भारतासाठी दिलासा! ४६,५०० टन LPG घेऊन 'नंदा देवी' टँकर गुजरातच्या वदिनार बंदरात दाखल

SCROLL FOR NEXT