Sharad Pawar & Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : जागावाटपात सर्वाधिक जागा ठाकरे गटाला मिळणार; 'वंचित' अन् 'स्वाभिमानी'चा महाविकास आघाडीत समावेश?

महाविकास आघाडीने इतर मित्र पक्षांसोबत जागा वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. महाविकास आघाडीमध्ये ‘वंचित बहुजन आघाडी’ आणि ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’लाही सामावून घेण्यावर मतैक्य झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईः लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची चिन्हे दिसत असतानाच राज्यात महाविकास आघाडीने इतर मित्र पक्षांसोबत जागा वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. महाविकास आघाडीमध्ये ‘वंचित बहुजन आघाडी’ आणि ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’लाही सामावून घेण्यावर मतैक्य झाले आहे.

‘वंचित’ला २ तर ‘स्वाभिमानी’ला १ जागा ठाकरे गटाकडून दिली जाऊ शकते. सर्वाधिक जागा ठाकरे गटाला देण्यावर या बैठकीत एकमत झाले. त्यापाठोपाठ काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’ला (शरद पवार गट) जागा देण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी चार जागा ठाकरे गटाला सोडण्यात येणार आहेत.

महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीस काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (शरद पवार गट) जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तर शिवसेना ठाकरे गटाकडून खा. संजय राऊत आणि खा. विनायक राऊत आणि ‘ माकप’चे प्रतिनिधीही उपस्थित होते. नरिमन पॉइंट येथील ट्रायडन हॉटेलमध्ये सलग सात तास आजची बैठक पार पडली. ही बैठक सुरू असतानाच बाहेर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे मानापमान नाट्य सुरू होते. अखेरीस बैठक सुरू असतानाच त्यांची मनधरणी करण्यात आली.

महाविकास आघाडीच्या बैठकीत काही मतदारसंघांबाबत अद्याप एकमत झालेले नसले तरी लोकसभेची जागा जिंकण्यासाठी तुल्यबळ उमेदवार ज्यांच्याकडे असेल त्या पक्षाला तो मतदारसंघ दिला जाईल. यासाठी काही मतदारसंघांची अदलाबदल होऊ शकते. मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे जाणार आहेत. दोन जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे.

शेट्टींसाठी हातकणंगले सोडणार

अकोला मतदारसंघासह अजून एक मतदारसंघ हा वंचित बहुजन आघाडीसाठी सोडला जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र दोन जागांवर आंबेडकर तयार होणार का? यावरही या बैठकीत चर्चा झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना हातकणंगलेची जागा देण्याची तयारी आघाडीने दर्शविली. ‘माकप’कडून आजच्या बैठकीत दोन जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यांनी शिर्डी आणि परभणीच्या जागेवर दावा केला आहे.

आघाडी मजबूत अन् एकसंघ

महाविकास आघाडीची पुढील बैठक ३० जानेवारीला होणार आहे. याबाबत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले, ‘‘ महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आणि एकसंघ आहे. आम्ही हसतहसत बैठकीतून आलेलो आहोत. सर्व जागांवर व्यवस्थित चर्चा झाली. जागावाटप पार पडले आहे. ‘वंचित’चे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासोबतही आमची व्यवस्थित चर्चा झाली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतात...भ्रष्टाचाराचं कोणतं प्रकरण कानावर आलं नाही...अण्णा हजारेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक!

Monsoon Beach Travel: पावसाळ्यात समुद्रकिनारी फिरायला जातंय? या गोष्टी लक्षात ठेवा

मोठा निर्णय : नीता अंबानीची टीम पुढील हंगामात नव्या नावासह मैदानात उतरणार, मुंबई इंडियन्स फ्रँचायझी...

Maharashtra Latest News Live Update : नागपुरात उद्या तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर भोसलेकालीन काळी-पिवळी मारबत मिरवणूक निघणार..

Daulat Sugar Factory Auction : दौलत साखर कारखान्याची होणार विक्री, ‘एनसीडीसी’कडून लिलावाची नोटीस; ९ ऑक्टोबरला ई-लिलाव

SCROLL FOR NEXT