Uddhav Thackeray’s Shiv Sena reaction on Malegaon bomb blast verdict by NIA court esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena UBT: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोठं विधान!

Shivsena UBT on Malegaon Bomb Blast Verdict: जाणून घ्या, भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांना नेमकं काय सुनावलं आहे?

Mayur Ratnaparkhe

Uddhav Thackeray’s Shiv Sena Reacts to Malegaon Verdict: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणातील सातही आरोपींना न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले आहेत. यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विशेष प्रतिक्रिया आली आहे.

पक्षाने म्हटले की, काही नेत्यांनी भगवा दहशतवाद अशी व्याख्या केली होती, परंतु भगवा कधीच दहशतवादाशी जोडलेला असू शकत नाही. दुर्दैव आहे की काही लोक भगवा दहशतवाद म्हणतात. न्याय मिळण्यासाठी वेळ लागतो, परंतु न्याय नक्कीच मिळतो.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी म्हटले की,  न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. १७ वर्षानंतर का असेना पण सत्याला न्याय मिळाला. विचार करा या १७ आरोपींच्या आयुष्यात ही १७ वर्षे कशी गेली असतील? याचसोबत एक प्रश्नही निर्माण होतो की, १७ वर्षे लागली न्याय मिळण्यासाठी? आम्ही न्यायालयाचे आभार व्यक्त करतो, की उशीरा का असेना पण न्याय मिळाला. न्यायालयाने हेही म्हटले की दहशतवादाचा कोणथाही धर्म नसतो.

याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हणाले, न्यायालयाने म्हटले आहे की, पुराव्यांची कमी आहे. मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटाची घटना, ज्यामध्ये जवळपास १८७ लोकांचा मृत्यू झाला आणि ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. त्यामध्येही सर्व आरोपींना सोडण्यात आले होते.

 मग अशावेळी दोन प्रश्न निर्माण होतात, पहिला म्हणजे जर ते गुन्हेगार नव्हते तर मग त्यानां इतकी वर्षे तुरुंगात बंदिस्त का ठेवलं? आणि दुसरा म्हणजे आमचे पोलीस पुरावेही देवू शकत नाही? हा जो तपास सुरू आहे, त्याबाबत मला जास्त काळजी वाटत आहे. कुणीतरी हे केलं असणार, हे तपास विभाग आणि पोलिस विभागाचे मोठे अपयश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT