Mamata Banerjee Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

आमदारांना आसामऐवजी बंगालला पाठवा; ममता बॅनर्जींची राज्याच्या गोंधळात उडी

शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेसह सध्या आसाममधल्या गुवाहाटी इथल्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदेंचं बंड आता अधिकच तीव्र झालेलं आहे. या बंडामुळे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसलेला आहे. शिंदेंसोबत बंडखोर आमदार सध्या आसाममधल्या हॉटेलमध्ये बसून खलबतं करत आहेत. या सगळ्या गोंधळात आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही उडी घेतलेली आहे. (Mamata Banerjee in Maharashtra Politics)

कोणीतरी तुमचाही पक्ष एक दिवस फोडेल असा इशाराही ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी दिला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्हाला उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि सर्वांनाच न्याय मिळवून द्यायचा आहे. आज भाजपा सत्तेत आहे. तुम्ही मनी, मसल, माफियाची ताकद वापरत आहात. पण एक दिवस तुम्हालाही जावं लागेल. कोणीतरी तुमचा पक्षही फोडेल. हे चुकीचं आहे. मी या गोष्टीला पाठिंबा देत नाही. आसामऐवजी त्या बंडखोर आमदारांना बंगालला पाठवा. आम्ही त्यांचा चांगला पाहुणचार करू. महाराष्ट्रानंतर ते इतर सरकारांनाही धक्का देतील. आम्हाला लोकांसाठी, संविधानासाठी न्याय हवा आहे.

दरम्यान, आसाममध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदार ज्या हॉटेलमध्ये राहतायत, त्या हॉटेलबाहेर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यानंतर ममता बॅनर्जी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभं राहत असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT