devendra fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Fadnavis on Maratha Morcha : ''गंभीर स्वरुपातील गुन्हे मागे घेता येणार नाहीत'', फडणवीसांचं स्पष्टीकरण

मराठा आरक्षण आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे. सरकारने अधिसूचना काढून सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शवल्याने आंदोलन मागे घेण्यात आलं. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

संतोष कानडे

मुंबईः मराठा आरक्षण आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे. सरकारने अधिसूचना काढून सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शवल्याने आंदोलन मागे घेण्यात आलं. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

कुणबी नोदींचे प्रमाणपत्र वाटप आणि सगेसोयऱ्यांना आरक्षण, या मागणीसोबत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची एक मागणी पुढे करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आदेश दिल्याचं सांगण्यात आलेलं होतं.

त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचा शब्द दिला आहे. नागपूरमध्ये बोलताना फडणवीस म्हणाले की, आंदोलनाशी संबंधित गुन्हे मागे घेतले जातील. घरांची जाळपोळ किंवा जीवघेणा हल्ला, यासंबंधी गुन्हे मागे घेता येणार नाहीत. कारण तसे कोर्चाचे निर्देश आहेत.

दरम्यान, शनिवारी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलस्थळी वाशी येथे जात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडलं. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांच्या गणगोतांना, सगेसोयऱ्यांना, रक्ताच्या नातेवाईकांना जे सजातीय आहेत; अशांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. त्याबाबतचा निर्णय १६ फेब्रुवारी किंवा त्यानंतर होणार आहे.

दुसरीकडे मराठा समाजबांधवांनी मुंबईतूनच गुलाल उधळत मोठा जल्लोष साजरा केला. मनोज जरांगे पाटील यांचा ताफा अंतरवाली सराटीकडे रवाना झाला असून राज्यभरात मराठ्यांनी जल्लोष सुरु केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivali News : कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Niphad Crime : अंध अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास पंचवीस वर्षे सक्तमजुरी

Akola News : महापालिकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम लांबणीवर; राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारीत तारखा जाहीर

Murlidhar Mohol : महापालिकेची निवडणूक वेळेत होईल; मुरलीधर मोहोळ यांचा दावा

Latest Marathi News Live Update: करवाढीवर सर्वोच्च न्यायालयात पार पडली सुनावणी

SCROLL FOR NEXT